सरकार फुकट पगार देण्यासाठी आहे का? – नितीन गडकरी

नवी दिल्ली :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे रस्ते वाहतुकीसह सूक्ष्म, लघु  आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभारही आहे. या मंत्रालयाच्या एका कार्यक्रमात गडकरी यांनी सरकारी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.

गडकरी यांनी गायी आणि म्हशीचे उदाहरण देऊन अधिकाऱ्यांना सुनावले. “आपण गायी-म्हशी घरी पाळतो. त्यांनी चांगले दूध द्यावे म्हणून भरपूर खुराक देतो. पण खुराक दिल्यानंतरही दूधच मिळत नसेल, तर अशा जनावरांचा काय उपयोग?” असा प्रश्न गडकरी यांनी या कार्यक्रमात विचारला. तसेच सरकारी अधिकाऱ्यांच्या अधिक आवश्यकतेच्या मागणीचाही त्यांनी समाचार घेतला. म्हणाले की, “सरकार फक्त लोकांना फुकट पगार देण्यासाठी आहे का? इतके अधिकारी आणि एवढ्या गुंतवणुकीची गरज काय?”

नितीन गडकरी यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या कामावरील नाराजी व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (NHAI) इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सुनावले होते. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA-1) कार्यकाळात मंजूर झालेल्या इमारतीचे काम NDA सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात पूर्ण झाले. त्यावेळी गडकरींनी नाराजी व्यक्त केली. “काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे फोटो लावायला हवेत.” असे बोलत त्यांनी कार्यक्रमात संताप व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER