वझेंना सरकार पाठीशी घालतंय का? फडणवीसांचा सवाल

Devendra Fadnavis - Anil Deshmukh - Uddhav Thackeray

मुंबई :- सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सोमवारी अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात टीका-टिप्पणी झाली. मात्र आज अधिवेशनात मनसुख हिरेन मृत्युप्रकरणावर गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली.

मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब समोर आला आहे. मनसुख हिरेन यांची गाडी स्फोटकांसाठी वापरण्यात आली, ती गाडी नोव्हेंबरपासून ५ फेब्रुवारीपर्यंत सचिन वझे वापरत होते, हे मनसुख यांच्या पत्नीने सांगितले. मनसुख यांचा तपास सचिन वझे यांनी केला. मनसुख हिरेन हे सचिन वझेसोबत जात होते. मनसुख हिरेन यांचे पत्रदेखील सचिन वझे यांनीच मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पाठवायला लावले, असे हिरेन  यांच्या पत्नीने सांगितले. मनसुख हिरेनला दोन दिवस अटक होणार, असे सचिन वझे यांनीच सांगितले होते. “माझे पती हिरेन यांचा खून सचिन वझे यांनीच केला.” असा आरोप त्यांच्या पत्नीच्या बयाणात असल्याचे फडणवीसांनी सांगितले.

सचिन वझे मुंबईचे क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख आहे. या पदावर असताना वझे यांना पुरावे नष्ट करण्याची संधी आहे. त्यांना या पदावर ठेवून चौकशी होऊ शकत नाही. त्यांना अटक झाली पाहिजे. सचिन वझे यांना अटक केल्यास अनेकांची नवे समोर येऊ शकतात. गृहमंत्र्यांनी कबूल केले की, वझेंना हटवू; मात्र मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर सचिन वझेंना हटविण्याचा निर्णय बदलण्यात आला. सरकार वझेंना पाठीशी का घालत आहे, असा सवाल करत संपूर्ण प्रकरणात सरकार उघड पडल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्र ‘आत्महत्येचे डेस्टिनेशन’ होते आहे का, फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोमणा 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER