लसीकरणाचा वेग मंदावल्यानं कोरोना नियंत्रणात येत नाहीये का?

Maharashtra Today

देशात कोरोनाचा (Corona) उद्रेक दिवसेंदिवस वाढतो आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण हाच एकमेवर प्रभावी मार्ग आपल्याकडे आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन केंद्र सरकारनं (Center Govt) मोठा निर्णय घेतला. १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांनाच कोरोनाची लस देणार असल्याची घोषणा केंद्र सरकारनं केलीये. वाढत्या कोरोनाच्या बातम्यांमध्ये ही सकारात्मक बाब असल्याचं बोललं जातंय. भारतात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. १ मार्चपासून ६० वर्षांवरील नागरिकांना आणि इतर आजार असणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तींना लस द्यायला सुरुवात झाली होती. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी लस उपलब्ध झाली.

राज्यातल्या कोरोना उद्रेकाला लसीकरणाचा मंदवेग जबाबदार ?

राज्याचा विचार करायचा झाली तर, लसीकरणाचा वेग जितका मंद होता त्याच्या कित्येक पट वेगानं कोरोनानं राज्याला विळखा घातला. ‘केंद्राकडून नियमीत लसींचा पुरवठा होत नसल्यामुळं लसीकरणाचा वेग मंदावला आहे.’ असं महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणत होती तर ‘राज्याच्या ढिसाळ नियोजामुळं लसीकरण वेगात होत नाही.’ असं प्रतिउत्तर केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshavardhan) यांनी दिलं होतं. महाराष्ट्राला दिलेल्या लसींपैकी ५ लाख डोस वाया गेले असा आरोप भाजपच्या नेत्यांनी कागदपत्र दाखवत केला होता. यामुळं कोरोनाच्या लसीकरणाला (Corona Vaccination) ढिसाळ नियोजन जबाबदार आहे का ? अशा राजकीय वर्तुळात चर्चा होती.

नव्या विषाणूवर कोरोनाची सध्याची लस प्रभावी ठरते का?

कोरोनाचा नवा स्ट्रेन आल्याची वैद्यकीय तज्ञ सांगत होते. कोरोनच्या नव्या विषाणूवर सध्या उपलब्ध असलेली लस उपयुक्त ठरु शकते का? असा प्रश्न विचारला जात होता. त्याच स्पष्ट शब्दात उत्तर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आधीच दिलं होतं. २०२० हे वर्षं संपत असताना ब्रिटन आणि मागोमाग दक्षिण आफ्रिकेत बदललेल्या कोरोना व्हायरसचा उद्रेक सुरू झाला. हा व्हायरस जास्त संसर्गजन्य असल्याचंही दिसून आलं. या नवीन कोरोना व्हायरसवरही सध्याची लस काम करेल का हा प्रश्न सगळ्यांना आहे. त्यावर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्ध म्हणाले होते. ” युके आणि दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नवीन कोरोना व्हायरसपासून सध्याच्या लसी बचाव करू शकणार नाहीत, असं कुठल्याही संशोधनात आढळलेलं नाही.’ असं त्यांनी आधीच स्पष्ट केलं होतं.

१८ वर्षापुढील मुलांनी कशी करायची नोंदणी

कोरोना लस घेण्यासाठी १८ वर्षापुढील युवक युवतींच्या नोंदणीला २८ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. १ मे पासून त्यांना लस भेटेल असं सांगितलं जातंय. कोरोनाची लस घेण्यासाठी नोंदणी घरबसल्या मोबाईलवरुन करणं शक्य आहे. यासाठी को-विन या मोबाईल अॅपवर नाव नोंदवता येतं.

तुमचं वय, लिंग, आयडी प्रुफचे फोटो, जन्मतारिख, आजार वगैरेची माहिती भरल्यानंतर त्या महितीचे अवलोकन केले जाते. नंतर तुमचं नाव नोंदवलं जातं. मेसेज द्वारे जवळच लसीकरण केंद्र आणि तारिख आणि लसीकरणाची वेळ तुम्हाला कळवण्यात येते.

अशी घ्यावी काळजी

युवकांसाठी लसीकरणाची सुविधा येत्या १ पासून सुरु होणार आहे. या वेळी लस घेताना नेमकी काय काळजी घ्यायची आहे, लस कुणी घ्यावी, कुणी घेऊ नये यावरही आरोग्य मंत्रालयाने एक पत्रक जारी केलं आहे. राज्यसरकार आणि केंद्रसरकारला ते पाठवण्यात आलंय. या पत्रात यासंबंधी मार्गदर्शतत्त्वांवर उजेड टाकण्यात आलाय.

केंद्रानं घेतलेल्या निर्णयानूसार १८ वर्षांवरील लोकांचंच लसीकरण करण्यात येईल. दोन लशींना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पण, एका व्यक्तीला दोन डोस देताना एकाच प्रकारची लस दिली जावी. पहिला डोस घेतल्यावर एखाद्या व्यक्तीला लशीची रिअॅक्शन आली, म्हणजे लसीचे काही विपरित परिणाम दिसून आले तर, अशा व्यक्तीला दुसरा डोस दिला जाऊ नये.

गर्भवती किंवा बाळ अंगावर पिणारं असेल तर अशा महिलेनं लस घेऊ नये. लशीच्या चाचण्या गर्भवती महिलांवर झालेल्या नाहीत, त्यामुळे त्या अशा महिलांवर कसा परिणाम करतात हे माहीत नाही. म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. ज्यांना सध्या कोव्हिड-19 झालेला आहे आणि ते उपचार घेतायत अशांना लस देण्यात येऊ नये. आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यावर चौदा दिवसांनंतर अशा व्यक्तींचा विचार होऊ शकतो.

विश्वसनीय स्त्रोतांचाच आधार घ्या!

समाज माध्यम आणि इतरांशी होणाऱ्या चर्चेतून कोरोना लसीकरणावर बरीच माहिती समोर येते आहे. त्यातली कुठली खरी, कुठली खोटी हा प्रश्नही आहे. त्यामुळे सरकारी वेबसाईट्सवर बरीच माहिती आतापर्यंत आलेली आहे. आरोग्यविभागाची वेबसाईट, पीआयबी वेबसाईट. अशा अधिकृत माध्यमांवरील माहितीवरच विश्वावस ठेवावा असं सांगण्यात आलंय.

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button