पोलिसांची काम अशी करतोस? अजित पवारांनी घेतली ठेकेदाराची झाडाझडती

Ajit Pawar - Maharashtra Today

पुणे : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार सकाळी पुणे पोलीस मुख्यालयातील ब्रिटिशकालीन वास्तूच्या नुतनीकरणाची पाहणी केली. या वास्तूमध्ये आता विविध विभागाची कार्यालये सुरू होणार आहेत. अजित पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली. नूतनीकरणाचे काम सदोष काम आढळल्याने ठेकेदाराची कानउघाडणी केली.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह अधिकारीही उपस्थित होते. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील विविध कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. त्या कामांची पाहणी करण्यासाठी अजित पवार हे सात वाजून तीस मिनिटांनी येणार असल्याने सहा वाजेपासून अधिकाऱ्यांची तयारी सुरू होती.

अजित पवार यांनी कार्यालयाच्या छताबाबत नाराजी व्यक्त केली. कामाच्या ठेकेदाराला बोलावले. ठेकेदार समोर येताच म्हणालेत – अरे, काय काम केले आहे. पोलिसांची काम अशी करतोस? त्यांनी आयुक्तांकडे नाराजी व्यक्त केली. एका भिंतीवर प्लास्टर आणि रंगकाम व्यवस्थित नसल्याचे त्यांच्या नजरेस पडले. ते संतापले. ‘अरे काम काय केले आहे. आमच्या भाषेत सांगायचे झाल्यास छाचूगिरी काम केले आहे, ते फटकारले.

यानंतर अधिकाऱ्यांनी “दादा, आम्ही पुढील १५ दिवसात काम करून घेतो,’ असे सांगितले. अजित पवारांनी ठेकेदाराकडे छतावरील पत्र्यांबद्दल चौकशी केली. ‘पत्रे कोणत्या कंपनीची वापरली आहे, असे विचारताच ठेकेदार म्हणाला, ‘दादा, एका कंपनीचे वापरले आहे.’ त्यावर ‘टाटा सोडून कोणत्याही कंपनीचे पत्रे वापरायचे नाही,’ असा आदेश पवारांनी ठेकेदाराला दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या कामाचीही खरडपट्टी काढली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button