संजय राऊत पवारांचे प्रवक्ते आहे का? यूपीएबाबत त्यांना बोलण्याचा अधिकार नाही – नाना पटोले

Nana Patole - Sanjay Raut

मुंबई :- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी “शरद पवार(Sharad Pawar) यांच्याकडे युपीएचं अध्यक्षपद द्यायला हवे, त्यांना अध्यक्षपद देण्यास कुठल्याही पक्षाचा विरोध नाही, अशी भूमिका पुन्हा एकदा मांडली आहे. मात्र, यावरून आता काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेना युपीएचा घटक पक्ष नसल्याने राऊतांना युपीएबाबत बोलण्याचा अधिकार नाही. संजय राऊत (Sanjay Raut) हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल करत त्यांच्या विधानाला महत्व देण्याची गरज नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आजव्यक्त केली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

युपीएचं नेतृत्व कोणी करावं हे युपीएच्या सदस्यांनी ठरवलं आहे. मी परवाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे ते शरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहेत का असा प्रश्न केला होता. ज्या गोष्टीशी संबंध नाही त्यावर संजय राऊतांनी चर्चा करु नये इतकाच आमचा सल्ला आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

यावेळी पटोले म्हणाले की, मनसुख हिरेन हत्याप्रकरणात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत बोलताना सीडीआरचा उल्लेख केला होता. हा सीडीआर खोटा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खरा सीडीआर असेल तर त्यांनी तो प्रसारमाध्यमे आणि जनतेला दाखवावा. देवेंद्र फडणवीस हे खोटा सीडीआर दाखवून राज्याला बदनाम करण्याचे काम करत आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांनीच युपीएचे नेतृत्व करावे हे अनेक अनेक पक्षांना मान्य ; संजय राऊतांचे विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER