संजय राऊतांना ‘बॉस’ उद्धव ठाकरेंपेक्षा शरद पवारच जवळचे?

Uddhav Thackeray-sanjay raut-sharad pawar.jpg

नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत, कंगना रणौत ही प्रकरणे चांगलीच तापू लागल्याने महाराष्ट्रात मोठा राजकीय पेच निर्माण झाला. तो सोडवण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार कामाला लागले; पण या दोन्ही प्रकरणांची बारीक छाननी केल्यावर असे लक्षात  आले की, यात गुंतलेले लोक त्यांच्याच जवळचे आहेत.

सुशांत सिंह प्रकरण आत्महत्येचे आहे असे जाहीर करणारे गृहमंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. कंगनाशी शाब्दिक वादात गुंतलेले संजय राऊतही पवारांशी जवळीक राखून आहेत. मुंबई पोलिसांनी सुशांत प्रकरणाचा पचका केला म्हणावे तर गृह खाते राष्ट्रवादीकडेच आहे. बिहारचे एनडीए नेते या प्रकरणाच्या युद्धात उतरले. त्यांनी परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला. दिल्लीतील आतली माहिती देणारे सांगतात की, राऊत यांचे बॉस भलेही उद्धव ठाकरे असतील; पण ते पवारांना अधिक जवळचे वाटू लागले आहेत.

वास्तविक पाहता संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक कारणांनी नाराज आहेत. ठाकरे हे ना राऊतांना बोलू शकत ना देशमुखांना वेसण घालू शकत ! अर्थात ही गोष्ट वेगळी की ठाकरेंनी मौन सोडले नाही आणि महापालिकेने हे प्रकरण नीट हाताळले नाही.  म्हणूनच सगळा पचका झाला; पण शरद पवार खुद्द या प्रकरणात लक्ष घालून असल्याने राऊत वेळोवेळी त्यांच्याशी भेट घेत असतात, हे विशेष.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER