नियमाचे पालन करणं हा अहंकार आहे का? : संजय राऊत

Governor Bhagat Singh Koshyari - Sanjay Raut

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे खासगी कामासाठी उत्तराखंडला जाणार होते. त्यामुळे नियमानुसार त्यांना सरकारी विमान नाकारण्यात आले. सरकारने राज्यघटनेतील नियमांचे पालन करणे, हा अहंकार आहे का, असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला.

ते गुरुवारी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना राज्यपालांना विमान नाकारल्यामुळे निर्माण झालेल्या वादासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे पूर्णपणे समर्थन केले. राज्य सरकारने सूडाच्या भावनेने किंवा राजकारण म्हणून भगतसिंह कोश्यारी यांना विमान नाकारले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे राज्यपालांचा आदर करतात.

मात्र, व्यक्तिगत कामासाठी सरकारी यंत्रणा वापरता येत नाही, हा नियम आहे. एरवी राज्यपालांना महाराष्ट्र सरकारकडून हेलिकॉप्टर आणि विमान कायम उपलब्ध करुन दिले जाते. पण यावेळी तांत्रिक अडचणींमुळे तसे करता आले नाही. भगतसिंह कोश्यारी हे गोव्याचेही राज्यपाल आहेत. त्यामुळे त्यांनी अधुनमधून गोवा सरकारचे विमान वापरावे, थोडा फार त्यांच्यावरही टाकावा, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

विमान न दिल्याने राज्यपाल यांचा अपमान असेल तर कॅबिनेट शिफारस केलेली विधान परिषद आमदार यादी मंजूर न करणे हा कॅबिनेट शिफारस अपमान नाही का ? राऊत यांनी उपस्थित केला .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER