महाराष्ट्र करोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज आहे का?

Maharashtra Today

राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेमुळं मोठं आरोग्य संकट निर्माण झालंय. या संकटापासून बाहेर पडण्यासाठी सर्वच शक्यतांचा विचार केला जातोय. कोरोनाची दुसरी लाट येत्या १५ दिवसात कमी येईल असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. अशा परिस्थीत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी व्यक्त केलीये. यामुळं राज्यात चिंतेच वातावरण निर्माण झालंय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं व्यवस्थापन करण्यात राज्यसरकार पुर्णतः अपयशी ठरल्याचं चित्र असताना कोरोनाची तिसरी लाट. (3rd Wave) तिचा कालावधी आणि याबद्दल नागरिकांच्या मनात प्रश्न चिन्ह निर्माण झालेत.

कोरोनाची परिस्थीती

राज्यात आज दिवसभरात तब्बल ६६ हजार १५९ नवे कोरोनाबाधित रुग्ण वाढले. गेल्या चोवीस तासात तब्बल ७७१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात ६८ हजार ५३७ रुग्ण बरे झाले. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन असूनही रुग्णसंख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आरोग्यमंत्री टोपेंनी दिले कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत

राज्यातल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे अंदाज वर्तवले जात होते. याला आरोग्य मंत्र्यांनी दुजोरा दिलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थीत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाध साधल्या यावेळी त्यांनी कोरोनाच्या तिसर्या लाटेबद्दल विधान केलं, ते म्हणाले, “कोरोनाची तिसरी लाट कदाचित जुलै, ऑगस्टमध्ये अपेक्षित आहे. त्याआधी आपण ऑक्सिजनबाबत परिपूर्ण असलं पाहिजे. तिसऱ्या लाटेआधी ऑक्सिजन नाही हे ऐकून घेतलं जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे योग्य उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या”

ऑक्सिजन तुटवड्याबद्दल काय आहे म्हणनं

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याला ऑक्सिनजच्या तुटवड्यामुळं मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागलं. दुसऱ्या लाटेची तिव्रता लक्षा घेता तिसऱ्या लाटेची तयारी आतापासूनच करणं अपेक्षित आहे. राज्यातल्या ऑक्सिजन तुडवड्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आल्यावर आरोग्यमंत्री म्हणाले, “राज्याला सध्या १७१५ टन ऑक्सिजन लागत आहे. तेवढं पूर्ण ऑक्सिजन पुरवलं जात आहे. रेमडेसिवीरचा वापर मर्यादित प्रमाणात करा. आज दहा ते पंधरा हजार इंजेक्शन गरजेपेक्षा कमी पडत आहे. पण त्याचा अनावश्यक वापर करुन त्याचा रुग्णांचा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी.” असं अवाहन ही त्यांनी केलं

ऑगस्टमध्ये येणार कोरोनाची तिसरी लाट?

“राज्यात कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट महिन्यात येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्याआधी आपण ऑक्सिजनच्या बाबत परिपूर्ण असलं पाहिजे. प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनचा प्लांट असला पाहिजे. ऑक्सिजनसाठी आज जी धावपळ सुरु आहे, ती तेव्हा होता कामा नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, अशासुचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांन करण्यात आल्याचं ही ते म्हणाले”

“आरोग्यमंत्री गांजा मारुन पत्रकार परिषद घेतात का?”- आमदार पडळकरांचा संतप्त सवाल

दरम्यान राज्यात १ मे पासून कोरोनाच्या मोफत लसींचे वाटप होणार असल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं होतं. राज्य सरकारनं मात्र या गोष्टीसाठी असमर्थता दर्शवली आहे. राज्यात कोरोनाची बिकट परिस्थीती निर्माण झाली असताना लसीकरणही एकमेव बचावात्मक गोष्ट असल्याचं बोललं जातय. महाराष्ट्र सरकारनं यासंबंधी पुढाकार घेणं अपेक्षिते होतं परंतू आरोग्यमंत्र्यांनी या संबंधी असमर्थता दर्शवली. यावर आमदार गोपीचंद पडळकरांनी टीका केली.

“सकाळी महाराष्ट्रातल्या १८ वर्षापुढील व्यक्तींना १ मे नंतर लस देणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं, दुपारी पुन्हा पत्रकार परिषद घेत लस देता येणार असल्याचं ते म्हणाले. आरोग्यमंत्र्यांनी सकाळची पत्रकार परिषद गांजा मारुन घेतली होती का?” असा संतप्त सवाल आमदार गोपीचंद पडळकरांनी केला.

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button