
भारतीय जनता पार्टीचा रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्याशी संबंध आहे, असा आरोप सरकारमधील पक्ष करत आहेत. याला उत्तर देताना भाजपाचे नेते खा. रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) म्हणाले – एखादे चॅनल तुमच्यावर टीका करते म्हणून ते आमचे होते का?
या संदर्भात उल्लेखनीय आहे की, रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर भाजपाकडून राज्य सरकारवर तीव्र टीका करण्यात आली. त्यांच्या सुटकेसाठी आंदोलनही करण्यात आले. त्याचा वचपा काढण्यासाठी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घर आणि कार्यालयावर धाड टाकली, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
दानवे म्हणाले – अर्णब गोस्वामी यांच्यासारखे अनेक चॅनल्स आहेत. ते काही आमच्याबद्दल बोलत नाहीत का? माझ्यावर, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत नाही का? पण एखादे चॅनल तुमच्यावर टीका करते म्हणून ते आमचे होते का? आमचा अर्णब गोस्वामींशी काही संबंध नाही. यांनी केलेली कारस्थाने आपोआप उघड होऊ लागली आहेत.
ईडीच्या जेवढ्या कारवाया आमच्यावर झाल्या आहेत तेवढ्या कोणावर झालेल्या नाहीत. हात बरटलेले नसतील तर घाबरायचे कारण नाही. काहीच नसेल तर ईडी आणि सीडीला का घाबरता? मन साफ असेल तर काहीही होऊ द्या. हे नैराश्यातून केलेले आरोप आहेत, असा टोमणा त्यांनी मारला.
ही बातमी पण वाचा : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना ‘कन्टेम्प्ट’ची नोटीस काढावी का? गोस्वामी हक्कभंग प्रकरणात सुप्रीम कोर्टापुढे प्रश्न
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला