आंदोलनाच्या ठिकाणी खिळे ठोकणे सरकारला शोभतं का? – अजित पवार

Ajit Pawar

पुणे :- शेतकरी आंदोलन करत असताना तुम्ही खिळे ठोकता, ही पद्धत बरोबर आहे का? आंदोलक काय…चीन, पाकिस्तान, बांगलादेशमधून आले आहेत का, असा सवाल विचारत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली.

दिल्लीत दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकारसोबतच्या चर्चेच्या ११ फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. मात्र २६ जानेवारीला या आंदोलनाला हिंसक वळण लागले. कृषी कायदे रद्द करण्याबाबत शेतकरी ठाम आहेत. आज भारतीय किसान युनियन राष्ट्रीय, राज्य महामार्गावर चक्का जाम आंदोलन करणार आहे. याच पार्श्वभूमीवर सरकार व दिल्ली पोलीस यांनी आक्रमक पावले उचलली. तसेच कडेकोट बंदोबस्त तैनात करून खिळे ठोकले आहेत. याच मुद्द्यावरून पवारांनी सरकारवर टीका केली.

वीज बिल आंदोलनावर अजित पवारांची टीका
सोबतच विरोधकांकडून विनाकारण गैरसमज पसरवण्याचे काम सुरू आहे. आपण ५० टक्के वीज बिल माफ केले. त्यावरील व्याज आणि दंड व्याजदेखील माफ केले आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून वीज बिल आंदोलन करण्यात येत आहे. अशी टीका यावेळी पवारांनी केली. सरकारने पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कमी करावे आणि त्यांची दरवाढदेखील कमी करावी, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले आहे. फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना पवार म्हणाले की, “फडणवीस यांनी आधी केंद्राला पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करायला सांगावे, त्यानंतर आम्ही विचार करू.”

ही बातमी पण वाचा : राज्यपालांनी अंत पाहू नये ;   अजित पवार संताप अनावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER