अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे गुन्हा आहे? चित्रा वाघ

Chitra Wagh

मुंबई : पूजा चव्हाण या युवतीच्या मृत्यूप्रकरणी भाजपाच्या नेत्या चित्र वाघ यांनी, या प्रकरणातील संशयित राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्याविरुद्ध आक्रमकपणे मोहीम उघडल्यामुळे चिडलेल्या समाजकंटकांनी चित्र वाघ आणि संजय राठोड यांचे आक्षेपार्ह मार्फ फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. यासंदर्भात एका वृत्त वाहिनीशी बोलताना चित्रा वाघ यांनी प्रश्न केला – महाराष्ट्रात अन्यायाविरोधात आवाज उठवणे आता गुन्हा झाला आहे का?

त्या म्हणाल्यात, जे काम पोलिसांचे आहे, ते पोलिसांनी केले असते, जे काम सरकारचे आहे, ते काम सरकारने केले असते. तर आम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची काय गरज होती? स्वतः काही करायचे नाही आणि अशा पद्धतीने फौज उभी करायची! हे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर टाकून काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

…तोपर्यंत सहन करावेच लागणार

वाघ म्हणाल्या, मला सातत्याने हॅरेसमेंटचे फोन येत आहेत. त्याचे स्क्रीन शॉर्ट काढून मी डीजींसह सर्वांना पाठवत आहे. मी मुंबईच्या बाहेर जात असल्याने, जोपर्यंत मी गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत कारवाई होणार नाही. मग तोपर्यंत मी हे सगळं सहन करायचं का? आणि माझा गुन्हा काय, तर जिथे अन्याय झाला तिथे आवाज उठवत आहे. हा माझा गुन्हा आहे?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER