वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्रात कोरोना वाढतोय का? प्रकाश आंबेडकरांचा खोचक सवाल

Prakash Ambedkar

बीड :- केंद्रात राफेल घोटाळा आणि महाराष्ट्रात सचिन वाझे (Sachin Waze) प्रकरणामुळे दोन्ही सरकार अडचणीत आले आहे. म्हणूनच हा कोरोना व्हायरस देश सोडून केवळ महाराष्ट्रातच आलाय की काय, असा प्रश्न पडतोय, अशी मिश्किल टीका वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्यापासून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडी ठेवा असं आवाहनही प्रकाश आंबडेकर यांनी केले. ते बीडमध्ये बोलत होते.

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) व्यापाऱ्यांबाबत निर्णय घेण्यासाठी आजची मुदत दिली होती. मात्र अजूनपर्यंत त्यांचं काही स्टेटमेंट आलं नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपले शटर उघडे ठेवून व्यवहार सुरु ठेवावेत. सरकारची आर्थिक परिस्थिती खालावली असेल, तर आम्ही मदत करु पण व्यवहार करु द्या. देशात राफेल आणि राज्यात सचिन वाझे प्रकरण आहे, त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच कोरना आहे का असा प्रश्न पडतोय, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button