तुमची घाणेरडी प्रकरणे बाहेर येत आहेत म्हणून कोरोना वाढत आहे का? मनसेचा टोमणा

Raj Thackeray-Uddhav Thcakeray

मुंबई :- देशासह राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिववसात उघड झालेल्या गुन्हेगारी प्रकरणांमुळे शिवसेनेपुढच्या अडचणी वाढल्या आहेत यावरून मनसेने (MNS) शिवसेनेला (Shivsena) टोमणा मारला – तुमची घाणेरडी प्रकरणे बाहेर येत आहेत म्हणून राज्यातील कोरोना वाढतो आहे का?

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणालेत, महाराष्ट्राला लागून असलेल्या गोवा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यात कोरोना नाही. महाराष्ट्रातच तो कसा वाढतो आहे? सरकारचे कोरोनावर का कोरोनाचे सरकारवर प्रेम आहे ? लोकांना कोरोनाच्या नावाखाली भीती दाखवली जाते आहे.

कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होते तेंव्हा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा ‘वरळी पॅटर्न’ आणि कोरोना रुग्ण वाढले की लोक बेजबाबदार! अशी बोचरी टीका मनसेने ठाकरे आणि राज्य सरकारवर केली आहे. जनतेने काम करायचे नाही का ? सरकारने कोरोनाच्या नावावर लोकांना फक्त घाबरवायचे का? असाही सवाल मनसेने केला. वीज बिलाचे पैसे लोक कसे भरणार असा प्रश्न विचारत मनसेने लॉकडाऊन लावायचा तर वीज तोडणी बंद करा, अशीही मागणी केली आहे.

राज्यात गाजत असलेल्या सचिन वाझे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे म्हणाले की, हे प्रकरण ज्या पद्धतीने बाहेर आले, त्यामुळे मुंबई नाही तर महाराष्ट्र पोलिसांच्या विश्वासाहर्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्र सरकारच्या दबावाखाली पोलीस काम करत आहेत. सरकाराला प्रश्न विचारला की त्यांच्यावर पोलीस कारवाई करणार. या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे, पूर्ण सत्य बाहेर येऊ द्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER