तुंबलेल्या मुंबईला मुख्यमंत्री जबाबदार की मनपा? दरेकरांचा सवाल

Mumbai - Pravin Darekar

मुंबई :- मान्सूनने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. यामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून राज्य सरकार आणि मनपावर टीकास्त्र सोडले जात आहे.

‘मुंबईतील तुंबलेल्या पाण्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील.’ असे शिवसेना (Shiv Sena) नेते अनिल परब म्हणाले होते. त्यांच्या पाठोपाठ विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनीही राज्य सरकार तसेच महापालिकेवर टीका केली आहे. “आता तुंबलेल्या मुंबईला मुख्यमंत्री जबाबदार की मुंबई महानगर पालिका जबाबदार? हे त्यांनी सांगावं!” असा सवाल दरेकर यांनी अनिल परब (Anil Parab) यांना विचारला आहे.

“प्रकल्प वेळेत पूर्ण झाले नसल्याने समुद्राची भरती व मुसळधार पाऊस आला, म्हणून पाणी तुंबले असे सागत आहात. मुंबईसाठी २०-२५ वर्षे समुद्राची भरती, मुसळधार पाऊस हा काही नवीन नाही. आता तुंबलेल्या पाण्याची जबाबदारी मनपाने घ्यावी आणि तत्काळ उपाययोजना करावी. तसेच तुंबलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था उभी करावी व नागरिकांचे जनजीवन सुरळीत करावे.” असे दरेकर म्हणाले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button