मुख्यमंत्री ठाकरे आहेत की फडणवीस?

CM Uddhav Thackeray - Devendra Fadnavis
  • सोशल मीडियात व्हायरल होतोय मेसेज

मुंबई : सोशल मीडियात एक मेसेज कालपासून फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ‘मुख्यमंत्री आहेत तरी कोण? उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) की देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)?’ असं त्याचं शीर्षक आहे. एबीपी माझा चॅनेलच्या अभ्यासू  (म्हणजे हे आघाडी सरकार किती चांगलं काम करतंय या विषयी त्यांचा अभ्यास चांगला आहे म्हणून) पत्रकार रश्मी पुराणिक काल सर्वपक्षीय बैठक सुरू झाल्यानंतर बैठकीत कोण काय काय बोलतंय ते सांगत होत्या.‘लॉकडाऊनचा निर्णय आम्ही कालच घेतला होता पण देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी थांबलो’ असं मुख्यमंत्री बोलल्याचं रश्मीताई (पुराणिक) सांगत होत्या. याचा अर्थ राज्याचे निर्णय घेण्यासाठी ठाकरे यांनाही फडणवीसच लागतात असा घ्यायला हवा.

आता दुसरी बातमी अशी दाखविली की, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे बैठकीत असे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रात वजन आहे आणि ते वापरून त्यांनी जास्तीतजास्त लसी महाराष्ट्राला मिळवून द्याव्यात. केंद्राकडून जास्तीतजास्त लसी आणू शकणारी व्यक्ती म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही फडणवीस यांच्यावर टोपेंचा अधिक विश्वास आहे असा सकारत्मक अर्थ त्यातून घ्यायला हवा.

आता काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) काय म्हणाले बघा – ‘ते असे म्हणाले की, रेमडेसीवीर उत्पादक दोन मोठ्या कंपन्या गुजरातमधील आहेत. रेमडेसीवर इंजेक्शन महाराष्ट्राला अधिकाधिक मिळावेत यासाठी फडणवीस यांनी गुजरात सरकारशी बोलणी करावी. याचा अर्थ आता या क्षणी रेमडीसीवीरचा (Remdesivir) साठा महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात हवा असेल तर ते काम केवळ फडणवीसच करू शकतात असा विश्वास थोरात यांनादेखील आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील या बड्या नेत्यांचा फडणवीस यांच्या नेतृत्वावर एवढा विश्वास असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोेले (Nana Patole), राष्ट्रवादीचे (NCP) प्रवक्ते नवाब (Nawab Malik)मलिक हे केंद्र सरकारला आणि त्या निमित्ताने फडणवीस यांना टार्गेट करीत आहेत. या सरकारमध्ये पदापासून वंचित राहिलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केवळ लसींबाबतच नाही तर पीपीई किट, मास्कबाबतही केंद्राने महाराष्ट्राबाबत दुजाभाव दाखविला आणि अन्य राज्यांना जादा पुरवठा केल्याचा आरोप केला. भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांच्या आरोपातील हवा काढली. पीपीई किट, व्हेंटिलेटर्स, मास्क, हायट्रोक्लोरोक्विनच्या गोळ्यांचा हात राखून न ठेवता केंद्र सरकारने भरपूर पुरवठा महाराष्ट्राला केला आहे याची आकडेवारीच त्यांनी दिली.

मुळात कोरोना रोखण्यात राज्य सरकारला पूर्णत: अपयश आले आहे. ते झाकण्यासाठी केंद्रावर टीका करणे आणि अधुनमधून फडणवीस राजकारण करीत असल्याची आवई उठवत राहणे असे चालले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button