औरंगजेब तुमचा आदर्श आहे का? शिवसेनेचा काँग्रेसला सवाल

Balasaheb Thorat - Arvind Sawant

मुंबई :- औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन आता सत्ताधारी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) शिवसेना आणि काँग्रेसचे वादंग पेटले आहे. औरंगाबादचे (Aurangabad) नाव संभाजीनगर (Sambhajinagar) करण्यासाठी मागणीसाठी शिवसेना (Shiv Sena) पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. त्याला काँग्रेसकडून (Congress) मोठा विरोध होत आहे अशावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय? असा सवाल काँग्रेस नेत्यांना केला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी 1988 मध्ये औरंगाबादचे नाव संभाजीनगर असं घोषित केलं आहे. तेव्हापासून हा लढा सुरु आहे. शासनाकडून यापूर्वीच मान्यता मिळायला हवी होती. पण दुर्दैवाने तसे झालं नाही. पण आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असल्यामुळे पुन्हा एकदा ही मागणी जोर धरत आहे. कोरोनामुळे राहिले होते पण आता हे काम होईल”, असा दावा अरविंद सावंत यांनी केला आहे.

ही बातमी पण वाचा : …अन् जलेबी-फापडा भी आपडो!, आशिष शेलारांची शिवसेनेवर मिस्कील टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER