पोखरणमधल्या अणू बॉम्ब चाचणीच्या यशामागं नेमकं श्रेय अटलजींच की नरसिंहरावांचं?

Maharashtra Today

११ मे १९९८ ला राजस्थानच्या पोखरण या वाळवंटी भागात तीन मोठे स्फोट (atomic bomb test in Pokhran)झाले. संपूर्ण जगाला याचे हदरे मिडीयातून जाणवले. भारत अणू संपन्न राष्ट्र बनल्याची ती घोषणा होती. पोखरणच्या अणू चाचणीचा उल्लेख केला तर अटलजींच्या खात्यात याचं श्रेय जमा होतं पण याचा तपास करणं ही गरजेच आहे की यशाला गवसणी एकाच पंतप्रधानाने घातली की मागच्या पंतप्रधानांच यात काही योगदान होतं? काही असे प्रश्न असतात ज्यांच्या उत्तरावर पुर्ण विराम लागत नाहीत. पोखरणचं श्रेय कुणाला द्यायचं याचं उत्तर अटलजींनी स्वतः दिलंय.

२००४ च्या सभेत. ही सभा साधारण सभा नव्हती. शोक सभा होती देशाच्या माजी पंतप्रधानांची. पी. व्ही. नरसिंहरावांची. (Narasimha Rao) २३ डिसेंबर २००४ ला राव यांचं निधन झालं. ९ डिसेंबरला त्यांना हृदयविकाराचा झटका आला. १४ दिवसानंतर त्यांना ए.आय.आय.एम. एस. मध्ये भर्ती करण्यात आलं. तब्बल १४ दिवस त्यांनी प्रतिकार केला. त्यांच्या अंत्यविधीवेळी भाषणात अटलबिहारी वाजपेयी बोलत होते. “मे १९९५ साली जेव्हा मी पंतप्रधान पदाची सुत्र ताब्यात घेतली त्याच दिवशी नरसिंह रावांनी मी सांगितलं होतं. अणू बॉम्ब बनून तयार आहे. मी तर फक्त स्फोटाची चाचणी केली. सामग्री तयार आहे. तुम्ही पुढाकार घ्यावा असं रावांनी मला सांगितलं होतं.”

पंतप्रधान पदावर असताना नरसिंह रावांनी डिसेंबर १९९५ ला अणू बॉम्बच्या चाचणीची तयारी केली होती. पण त्यांना हे नियोजन पुढं ढकलावं लागलं होतं. या मागं अनेक कारणं सांगितली जातात. यात एक किस्तसा आहे. ज्यावरुन राव यांनी अणू बॉम्बची चाचणी पुढं का ढकलली याचं उत्तर मिळतं. विनित सीतापती यांच्या ‘हाफ लॉयन’ या पुस्तकात हे उत्तर मिळतं. त्यांनी याच्या तीन शक्यता पुस्तकातून मांडल्यात.

पहिली शक्यता- राव यांनी डिसेंबर यांनी १९९५ अणू बॉम्बच्या चाचणीची योजना बनवली होती. पण अमेरिकेच्या सॅटेलाइटच्या नजरेतही बाब आली. अमेरिकेने भारतावर दबाव आणला. त्यावेळी ही चाचणी रद्द करावी लागली. दोन महिन्यांनंतर राव पुन्हा चाचणीसाठी तयार होते. डिसेंबर १९९५ ते एप्रिल १९९६ पर्यंत त्यांनी अणू बॉम्बची चाचणी करण्यासाठी केलेल्या सर्व नियोजनात अमेरिकेच्या गुप्तहेर संघटना आणि उपग्रहांनी ख्वाडा टाकला.

दुसरी शक्यता- भारतावर आंतराराष्ट्रीय प्रतिबंध लागण्याच्या आधी एकाच झटक्यात अणू बॉम्बची चाचणी पार पडणं गरजेचं होतं. या घटनेचा उल्लेख पत्रकार राज चेंगप्पा यांनी केलाय. राव यांनी कधीच परिक्षणासाठी अनुकुलता दाखवली नव्हती असा दावा त्यांनी केलाय. या शक्तेत शंकांना वाव आहे. यावर अनेक जण प्रश्नचिन्ह उपस्थीत करतात. राव अणू बॉम्ब चाचणी करण्याच्या तयारीत नव्हते तर त्यांनी वैज्ञानिकांना प्रकल्प थांबवायला लावला असता अशी शक्यताही बोलून दाखवली जाते.

तिरसी शक्यता- डिसेंबर १९९५मध्ये अणू बॉम्ब आणि परत एप्रिल १९९६मध्ये हायड्रोजन बॉम्ब अशा दोन बॉम्बचे परिक्षण करायचे होते. दोन्ही परिक्षणं वेगवेगळी करणं शक्य नव्हतं. वैज्ञानिकांकडून राव यांना सांगण्यात आलं होतं की बॉम्ब पुर्णपणे तयार नाहीत. अजून ६ महिन्यांची त्यांना वाट पहावी लागेल. यामुळं त्यांनी दोन्ही बॉम्बच्या चाचण्या पुढं ढकलण्याचा निर्णय घेतला होता. १६ मे १९९६ साली जेव्हा अटल बिहारी वाजपेयींची भेट ए.पी.जे. अब्दूल कलाम आणि पी. चिदंबरम यांनी घेतली होती. मागच्या सरकारकडून वाजपेयींच्या सरकारकडे बॉम्ब चाचणी हस्तांतरीत करण्याची ती प्रक्रिया होती.

अटलजींच्या १३ दिवसाच्या सरकारमध्ये ही अणू बॉम्ब चाचणी व्हावी, अशी त्यांची इच्छा होती पण सरकार स्थिर नसल्यामुळं त्यांना हा निर्णय घेता आला नाही. या साऱ्या घटनाक्रमाला पाहिलं तर राव आणि वाजपेयी दोन्ही पंतप्रधानांची अणूबॉम्बच्या चाचणीसाठी असलेली गंभीरता लक्षात येते. राव यांनी त्यांच्या कार्यकाळात वैज्ञानिकांना सुविधा देत. बॉम्ब तयार करण्यासाठी कसून प्रयत्न केले होते. अणू बॉम्ब तयार करण्यासाठी त्यांनी शक्य ती सर्व मदत वैज्ञानिकांना केली होती. नंतर १९९८ साली देशात स्थिर सरकार बनलं. वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले. तेव्हा अटलजींनी अजिबात वेळ वाया घालवला नाही. त्यांचं सरकार नवं होतं. त्यांचे संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांनी चीनवर वादग्रस्त टिप्पणी केली होती. एनडीएच्या हिस्सा असणाऱ्या जयललिता सरकारी कोंडी करण्याच्या प्रयत्ना होत्या. सरकार समोर अनेक दुविधा होत्या पण अटलजींना पहिल्यांदा अणूबॉम्बच्या चाचणीचा मुद्दा निकालात काढायचा होता.

या साऱ्या प्रतिकुल परिस्थीतीवर मात करत ११ मे १९९८ ला अटलजींनी पोखरनमध्ये अमेरिकेच्या उपग्रह आणि गुप्तहेर संस्थेंना चकवा देत पोखरणवर अणू बॉम्बची यशस्वी चाचणी घडवून आणली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button