जनतेपेक्षा मद्य महत्त्वाचे आहे का? चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल

Chandrakant Patil-Uddhav Thackeray.jpg

मुंबई :- राज्यात सध्या वीज बिल वसुलीचा मुद्दा चांगलाच पेटला आहे . ग्राहकांनी वीजबिलाची थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणने जाहीर केला आहे. यावरून आता भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.

कोविड-१९ च्या काळात मद्य विक्रीसाठीच्या शुल्कामध्येही ५० टक्के सूट दिली, मग वीज ग्राहकांना सूट देण्यात राज्य सरकारला कोणती अडचण निर्माण झाली आहे? जनतेपेक्षा मद्य महत्त्वाचं आहे का? याचे उत्तर द्या किंवा जनतेची माफी मागून हा निर्णय मागे घ्या! असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही काँग्रेसची जुनी परंपरा : चंद्रकांत पाटील 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER