इरफान खानच्या पत्नीची काळजाला भिडणारी पोस्ट !

irrfan-khan-wife-sutapa-shares-a-picture

मुंबई : बॉलिवूडचा सदाबहार अभिनेता इरफान खानचं २९ एप्रिल रोजी निधन झालं. त्याच्या निधनाच्या तीन दिवस आधीच त्याच्या आईचं निधन झालं होतं. या दोघांच्या निधनामुळे पूर्णत: हतबल झालेल्या इरफान खानच्या पत्नीने त्याच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे. तिची ही पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

इरफानची पत्नी सुतापा सिकदार आपल्या पोस्टमध्ये लिहिते की, ‘मी काही गमावलं नाही तर सर्वकाही मिळवलं आहे…’ एका ओळीच्या या पोस्टमधून त्या बरंच काही सांगून जातात. या एका ओळीतच त्यांचा खंबीरपणा लक्षात येतो. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांचं सांत्वन केलं आहे.

दरम्यान इरफान खान यांनी पूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पत्नी सुतापाविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. अगदी ‘जर पुन्हा जगायची संधी मिळाली तर पत्नीसाठी जगेन’ असं तो म्हणाला होता. यावरून त्याचं सुतापावर किती प्रेम होतं याचा अंदाज लावता येतो. मात्र इरफान खानला ती संधी मिळाली नाही. त्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. पतिनिधनानंतर सुतापाने एक फोटो शेअर करत काळजाला भिडावे असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

I have not lost i have gained in every which way..

A post shared by Sutapa Sikdar (@_sutapa_sikdar_) on