लोहा विधानसभा : उमेदवार खर्च दैनंदिनी तपासणी तीन टप्प्यात ,11 रोजी पहिली तपासणी

mhnews2

लोहा  :- तालुका प्रतिनिधी- लोहा विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीतील उमेदवाराच्या निवडणूक खर्चाचा दैनंदिनी हिशोबाच्या नोंदवहीची तपासणी तीन टप्प्यात करण्यात येणार आहे खर्चाची पहिली तपासणी 11 ऑक्टोंबर 2019 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उपकोषागार कार्यालय लोहा येथे होईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे निवडणूक विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे

निवडणूक खर्च संनियंत्रण व यावरील अनुच्छेदाच्या सारसंग्रह फेब्रुवारी 2019 अन्वये भारत निवडणूक आयोगाने उमेदवाराचा निवडणूक खर्च किमान तीन वेळा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे . निरीक्षक श्री. बजाज निवडणूक निरीक्षक खर्च हे उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तपासणी करणार आहेत त्याचा तारखा जाहिर केल्या आहेत.

खर्च तपासणी कार्यक्रमानुसार पहिली तपासणी 11 ऑक्टोंबर, दुसरी तपासणी 15 ऑक्टोंबर व तिसरी तपासणी 19 ऑक्टेांबर 2019 रोजी सकाळी 10 ते 1 या वेळेत उपकोषागार कार्यालय लोहा येथे करण्यात येणार आहे. उमेदवाराने निवडणूक खर्चाच्या दैनंदिन हिशोबाच्या नोंदवही अद्यावत नोंदवहीसह बँक पासबुक, चेकबुक, खर्चाचे प्रमाणके, इतर अनुषंगिक कागदपत्रासह उपस्थित रहावे. सदरील खर्च विषयक अभिलेखे तपासणीस उपलब्ध करुन न दिल्यास हिशोब सादर केला नाही, असे गृहित धरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 171-1 प्रमाणे तक्रार नोंदविण्यात येईल असे निवडणूक निर्णय अधिकारी पी एस बोरगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले