इरफानचे टीकाकारांना उत्तर, ‘मी तिचा साथीदार आहे, मालक नाही.’

Maharashtra Today

आपल्या पत्नीच्या एका पोस्टवरून क्रिकेटपटू इरफान पठान (Irfan Pathan) पुन्हा चर्चेत आहे आणि त्याने आपल्या टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. इरफानच्या पत्नीचे नाव सफा बेग (Safa Baig). आहे आणि तिने आपला एक फॕमिली फोटो पोस्ट केला आहे मात्र तो फोटो पोस्ट करताना तिने आपला चेहरा ब्लर (Blur) केला आहे. मात्र हे पाहून लोकांनी इरफानला टारगेट करायला सुरूवात केली होती. त्याला उत्तर देताना इरफानने स्पष्ट केले आहे की, ‘मी तिचा साथीदार आहे, मालक नाही. आपला चेहरा पुसट करणे हा तिचा निर्णय होता, आपला नाही.’ सफा बेग यांनी त्यांच्या मुलाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो पोस्ट केलाय आणि तो बघून लोकांनी असा समज करून घेतला की, इरफानने आपल्या पत्नीला चेहरा दाखवू नकोस असे सांगितले असावे.

यासंदर्भात आपल्या व्टिटर हँडलवरुन उत्तर देताना इरफानने म्हटलेय की, माझ्या राणीने आमच्या मुलाच्या अकाउंटवरुन हा फोटो पोस्ट केलाय मात्र त्यानंतर आम्हाला फार तिरस्कारपूर्ण मेसेजेस येत आहेत. तोच फोटो मी येथे पोस्ट करतोय. हा फोटो ब्लर करायचा निर्णय तिचाच होता आणि हो, मी तिचा साथीदार आहे, मालक नाही.’

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत इरफान आणि त्याचा भाऊ युसूफ या भावंडांनी कोरोनाबाधितांना अन्नदान, आॕक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर, आॕक्सिजन काॕन्सेन्ट्रेटर अशा माध्यमांतून खूप मदत केली आहे. पठान फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी आपले मदतकार्य चालवले आहे.

इरफानने पॕलेस्टिनच्या मुद्द्यावरही जाहिरपणे आपली मते व्यक्त केली होती. आणि त्याच्या पॕलेस्टिनसंदर्भातील मतांवरुन बॉलिवूड तारका कंगना रणावतने त्याच्यावर टीकासुध्दा केली होती.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button