‘हॅलो भाइयों बहनों…’ : रडवतोय इरफान खानचा चाहत्यांसाठी हा शेवटचा मेसेज

Irfan Khans Last Message On Twitter

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं वयाच्या ५४ व्या वर्षी कोकिलाबेन इस्पितळात निधन झालं. गेल्या अनेक वर्षांपासून ते कॅन्सरशी लढा देत होते. अभिनय आणि अनोख्या अंदाजामुळे त्यांनी जगभरात नाव कमावले . इरफानच्या निधनाच्या बातमीनंतर मनोरंजन, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

आजारी असतानाही त्यांनी आपला शेवटचा चित्रपट ‘अंग्रेजी मीडियम’चं शूटिंग पूर्ण केलं होतं. आजारामुळे आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करणं इरफानला शक्य झालं नाही; परंतु त्यांनी आपल्या फॅन्ससाठी एक ऑडिओ मेसेज जारी केला होता. या शेवटच्या ऑडिओ मेसेजमध्ये इरफानने फॅन्सना एक संदेश दिला होता.

‘अंग्रेजी मीडियम’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी इरफान खान यांनी हृदयस्पर्शी असा वॉइस मेसेज शेअर केला होता. यात त्यांनी आपल्या तब्येतीबद्दल सांगताना म्हटलं की, ‘मी आज तुमच्यासोबत आहेही आणि नाहीही… हा सिनेमा ‘अंग्रेजी मीडियम’ माझ्यासाठी फार खास आहे. माझी इच्छा होती की या सिनेमाचं प्रमोशन तेवढ्याच आत्मीयतेने करू जेवढ्या आत्मीयतेने आम्ही या सिनेमात काम केलं. पण खराब तब्येतीमुळे ते शक्य होईल असं वाटतं नाही.’ त्यांचा हा वॉइस मेसेज अनेक चाहत्यांच्या जिव्हारी लागत आहे. अंग्रेजी मीडियम सिनेमा त्यांच्यासाठी किती महत्त्वपूर्ण होता हे त्यांनी या मेसेजमध्ये सांगितले.

इरफान खानला बॉलिवूडने अर्पण केली श्रद्धांजली