मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची ‘फेम इंडिया २०२०’साठी निवड

Iqbal Chahal-BMC

मुंबई : धारावी पॅटर्न (Dharavi Pattern) राबवून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करणारे मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची ‘फेम इंडिया २०२०’ (Fame India 2020) मध्ये निवड झाली आहे. देशभरातील ५० प्रभावशाली सनदी अधिकाऱ्यांच्या कार्याची नोंद यामध्ये घेण्यात येते. त्यात चहल यांना स्थान देण्यात आले आहे.

कोरोना महामारीच्या काळात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांना हा बहुमान प्राप्त झाला आहे. सप्टेंबर महिन्यात त्यांना ‘आयएसीसी कोव्हिड क्रुसेडर २०२०’ (IACC Covid Crusaders 2020) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची आता ‘फेम इंडिया २०२०’ मध्ये निवड झाली आहे.

चहल यांनी कोरोना महामारीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाला थोपवण्यासाठी त्यांनी ‘चेस द व्हायरस’ ही मोहीम प्रभावीपणे राबवली. धारावीसारख्या झोपडपट्टीबहुल भागात अथक परिश्रम करुन कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी केलेले प्रयत्न तर इतर देशांनीही धारावी मॉडेल म्हणून स्वीकारले. या मोहिमेत त्यांनी टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रॅकिंग, ट्रि‍टमेंट आणि क्‍वारंटाईन ही पंचसूत्री अवलंबून प्रत्‍यक्ष काम केले. तसेच, मुंबईतील सर्व आरोग्‍य यंत्रणा, डॉक्‍टर्स, लोकप्रतिनिधी, खासगी दवाखाने, नर्सिंग होम, स्‍वयंसेवी संस्‍था यांच्यात समन्वय साधत मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात आणला. त्यांच्या या कामगिरीचे केंद्र सरकार, जागतिक आरोग्य संघटना, तसेच जागतिक बँकेनेही कौतुक केले. दरम्यान, इकबाल सिंह चहल यांना मिळालेल्या या बहुमानामुळे त्यांचे सर्वच स्तरावरून कोतुक होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER