राम मंदिरासाठी इकबाल अंसारी यांनीही दिले दान

Ayodhya Ram Mandir - Iqbal Ansari

दिल्ली : राम मंदिर (Ram Mandir) उभारणीसाठी निधी संकलनाच्या शेवटच्या दिवशी बाबरी मशिद (Babri Masjid) खटल्याचे फिर्यादी इकबाल अंसारी (Iqbal Ansari) यांनी दान दिले. त्यांनी संघ व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडे दान सोपवले. त्यांनी दाते म्हणून त्यांचे वडील हाशिम अंसारी आणि कुटुंबीयांची नावे लिहिली आहेत. हे दान त्यांनी ‘गुप्त दान’ स्वरूपात दिले. याचे कारण सांगताना ते म्हणालेत की, मुस्लीम धर्मात दान ‘गुप्त दान’ करावे, असे लिहिले आहे.मी याच परंपरेचे पालन केले.

अयोध्येत सर्व धर्माचे लोक राहतात. राम नगरीत रामाचे मंदिर होते आहे, ही आनंदाची बाब आहे, अशी भावना अंसारी यांनी व्यक्त केली.

मंदिरासाठी मिळालेल्या दानाबाबत माहिती देताना श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी सांगितले की, शुक्रवारपर्यंत निधी संकलानाचे काम पूर्ण झाल्यानंतर २१०० कोटी रुपये निधी जमा झाला आहे. यावर्षी १५ जानेवारी रोजी मंदिर उभारणीसाठी निधी संकलन अभियानाची सुरुवात करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER