आयपीएस शैलेश बलकवडे केंद्र आणि राज्याकडून सन्मानित

IPS Shailesh Balkawade

कोल्हापूर : उत्कृष्ट तपास व शोधकार्यासाठी देण्यात येणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री पदकाने देशातील अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येतो. गुन्हे तपासातील कौशल्याचा सन्मान व्हावा व तपासाचा दर्जा उंचावण्यासाठी या पदकांची सुरुवात करण्यात आली आहे. यावर्षीच्या पुरस्कारात कोल्हापूरचे (Kolhapur) जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचा समावेश आहे. याशिवाय शैलेश बलकवडे (IPS Shailesh Balkawade) यांना नक्षलग्रस्त भागात केलेल्या विशेष सेवेबद्दल राज्य शासनाकडून विशेष सेवा पदक देवून गौरविण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून विशेष सेवा पदकाचे शैलेश बलकवडे मानकरी ठरले.

काही महिन्यापूर्वीच बलकवडे यांनी कोल्हापूर अधीक्षक पदाचा पदभार स्विकारला आहे. तत्कलीन अधीक्षक डॉ. अभिनव देशमूख यांनी मटाका, सावकारी आणि येथील गुन्हेगाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. बलकवडे यांनी पदभार स्विकारल्यापासून गुन्हेगारी जगतावर पोलीसांची दहशत कायम ठेवली आहे. अवैध धंद्याला चाप, वाहतुकीला शिस्त, महिलांची सुरक्षा, सर्वसामान्य कोल्हापूरकरांच्या समस्यांचे जलद निराकरण करण्यात बलकवडे यांनी अल्पकाळात यश मिळवले. बलकवडे यांच्या कार्यपध्दतीवर सर्वसामान्य कोल्हापूरकर खूष आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला शैलेश बलकवडे यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या पुरस्काराची घोषणा झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER