कोरोना काळात यशस्वी ठरला IPL, रोहितने केले BCCI चे कौतुक

Rohit Sharma-BCCI

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर आणि पाचव्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावणार्‍या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने युएईमध्ये कोरोना व्हायरस साथीच्या दरम्यान IPL च्या १३ व्या सत्र यशस्वी आणि सुरक्षित आयोजन केल्याबद्दल BCCI चे कौतुक केले आहे.

IPL १३ वा सत्र सुरूवातीला मार्च अखेरपासून भारतात होणार होता, परंतु कोरोन विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अनिश्चित काळासाठी तहकूब करावे लागले. त्यानंतर १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत अबूधाबी, दुबई आणि शारजाह या तीन ठिकाणी हे आयोजन करण्यात आले होते.

जवळपास ६० दिवसांच्या स्पर्धेनंतर १० नोव्हेंबरला मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटलचा पराभव करत पाचव्यांदा जेतेपद जिंकले. दिल्लीची टीम प्रथमच अंतिम फेरीत पोहोचली होती.

रोहितने ट्विट केले की, “IPL च्या १३ व्या सत्राच्या आयोजनासाठी IPL आणि BCCI च्या सदस्यांची वचनबद्धता आणि शिस्ताचे मी कौतुक करतो.”

रोहित म्हणाला, “या व्यतिरिक्त मी आठही फ्रँचायझींना सलाम करतो की त्यांनी खेळाडूंना त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षित वातावरण ठेवले.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER