आयपीएलची शुक्रवारी रेड वि. ब्ल्यू सलामी लढत, रोहीत पुन्हा कोहालीला भारी ठरणार का?

Rohit Sharma - Virat Kohli - Maharastra Today
Rohit Sharma - Virat Kohli - Maharastra Today

आयपीएल 2021 (IPL 2021) ला आता दोनच दिवस उरलेत. शुक्रवार, 9 रोजी सलामी सामना चेन्नईच्या (Chennai) चेपॉक मैदानावर विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स (ब्ल्यू) (MI) आणि पहिल्या आयपीएल जेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या राॕयल चॕलेंजर्स बंगलोर (रेड) (RCB)\ यांच्यात होणार आहे. दुसऱ्या शब्दात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचा हा सामना आहे. दोन्ही संघातील स्टार खेळाडूंचा भरणा पाहाता हा सामना रंगतदार ठरेल यात शंका नाही. त्यात चेपॉकची खेळपट्टी काय रंग भरणार हेसुध्दा महत्त्वाचे ठरणार आहे.

सलामी सामन्यांत दोन्ही संघांची कामगिरी एकदम भिन्न राहिली आहे. मुंबईने आपले केवळ 31 टक्के सलामी सामने जिंकले आहेत तर बंगलोरचे हे प्रमाण त्याच्या दुप्पट 62 टक्के आहे.

मुंबईने 2013 पासुन आयपीएलचा आपला सलामी सामना जिंकलेला नाही पण त्यांची पाचही विजेतेपदे 2013 पासूनचीच आहेत. म्हणजे सलामी सामना गमावणे हा उलट मुंबई पलटणसाठी शुभशकून आहे. याउलट बंगलोरने 13 पैकी 8 सलामी सामने जिंकले आहेत पण विजेतेपद अद्याप एकही नाही.

या दोन संघातील लढतींपैकी 17 लढती मुंबईने जिंकल्या आहेत तर 10 बंगलोरने. या ठिकाणी कर्णधार म्हणून रोहित शर्माने 10-4 अशी विराट कोहलीवर बाजी मारली आहे. आणि सहाव्या विजेतेपदासाठी मोहीम सुरु करणाऱ्या मुंबई पलटनचे पारडे पुन्हा एकदा वरचढ आहे.

मुंबईचे सर्वाधिक सामने चेन्नईला आहेत आणि चेपॉकची खेळपट्टी फिरकीला सहाय्य करते हे येथे लक्षात ठेवावे लागेल. येथे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायची आणि 160 च्या वरच धावा करायच्या हा यशाचा मंत्र ठरू शकतो. त्यामुळे फिरकीवर जोर राहिल हा अंदाज आहे. मुंबईसाठी पियुष चावला, राहुल चहर, कृणाल पांड्या आणि जयंत यादव यांची कामगिरी महत्त्वाची ठरेल तर बंगलोरसाठी हीच जबाबदारी वाॕशिंग्टन सुंदर, शहबाज अहमद व युझवेंद्र चहलवर असेल.

चेन्नईला सामना आहे ही मुंबईसाठी जमेची बाजू आहे कारण 2012 पासून मुंबईने येथील आपले पाचही सामने जिंकले आहेत तर बंगलोरने येथील चारही सामने गमावले आहेत. युझवेंद्र चहल वि. रोहित शर्मा, विराट कोहली वि. जसप्रीत बुमरा या झुंजी बघण्यासारख्या राहतील. 2018 पासून बुमराने दोन वेळा कोहालीला बाद केलेले आहे.

या दोन संघांदरम्यानच्या सामन्यात विराट कोहलीने 126 च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक 637 धावा केलेल्या आहेत. मुंबईविरुध्द शतक करणारा ए.बी.डीविलियर्सही त्यांच्याकडे आहे.

*आयपीएलचे सलामी सामने*

2008-
कोलकाता नाईट रायडर्स वि.,वि. राॕयल चॕलेंजर्स, बंगलोर – 140 धावा

2009-
मुंबई इंडियन्स वि.वि. चेन्नई सुपर किंग्ज – केपटाउन- 19 धावा

2010-
डेक्कन चार्जर्स वि.वि.कोलकाता नाईट रायडर्स- मुंबई- 97 धावा

2011-
चेन्नई सुपर किंग्ज वि.वि. कोलकाता नाईट रायडर्स – चेन्नई- 2 धावा

2012-
मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज- चेन्नई- 8 गडी

2013-
कौलकाता नाईट रायडर्स वि.वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स- कोलकाता – 6 गडी

2014-
कोलकाता नाईट रायडर्स वि.वि. मुंबई इंडियन्स- अबुधाबी- 41 धावा

2015-
कोलकाता नाईट रायडर्स वि.वि. मुंबई इंडियन्स- कोलकाता- 7 गडी

2016-
रायाझिंग पूणे सुपरजायंटस वि.वि. मुंबई इंडियन्स- मुंबई- 9 गडी

2017-
सनरायझर्स हैदराबाद वि.वि. राॕयल चॕलेंजर्स बंगलोर- हैदराबाद- 35 धावा

2018-
चेन्नई सुपर किंग्ज वि.वि. मुंबई इंडियन्स- मुंबई- एक गडी

2019-
चेन्नई सुपर किंग्ज वि.वि. राॕयल चॕलेंजर्स बंगलोर- चेन्नई- 7 गडी

2020-
चेन्नई सुपर किंग्ज वि,वि. मुंबई इंडियन्स- अबुधाबी- 5 गडी

*आरसीबीचे सलामी सामने*
2008- पराभव वि.केकेआर
2009- विजयी वि. राजस्थान राॕयल्स
2010- पराभूत वि. केकेआर
2011- विजयी वि. कोची टस्कर्स
2012- विजयी वि.दिल्ली डेअरडेव्हिल्स
2013- विजयी वि. मुंबई इंडियन्स
2014- विजयी वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स
2015- विजयी वि. केकेआर
2016- विजयी वि. सनरायझर्स हैदराबाद
2017- पराभूत वि. सनरायझर्स हैदराबाद
2018- पराभूत वि. केकेआर
2019- पराभूत वि.सीएसके
2020- विजयी वि. सनरायझर्स हैदराबाद

*मुंबई इंडियन्सचे सलामी सामने*
2008- पराभव वि.आरसीबी
2009- विजयी वि. सीएसके
2010- विजयी वि. राजस्थान राॕयल्स
2011- विजयी वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स
2012- विजयी वि. सीएसके
2013- पराभूत वि. आरसीबी
2014- पराभूत वि. केकेआर
2015- पराभूत वि. केकेआर
2016- पराभूत वि. आरपीएस
2017- पराभूत वि. आरपीएस
2018- पराभूत वि. सीएसके
2019- पराभूत वि. दिल्ली कॕपिटल्स
2020- पराभूत वि.सीएसके

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button