IPL : या दोन नव्या खेळाडूंचा १०० कोटींच्या क्लबमध्ये समावेश, जाणून घ्या कोणाची किती कमाई, पहा संपूर्ण यादी

IPL च्या १४ व्या मौसमाची तयारी सुरू झाली आहे. सर्व संघांनी आपल्या खेळाडूंना रिटेन और रिलीज केले आहे. आता IPL चा मिनी लिलाव फेब्रुवारीमध्ये होणार आहे. अलीकडेच झालेल्या रिटेंशनमध्ये बर्‍याच खेळाडूंना त्यांच्या फ्रँचायझीद्वारे संधी देण्यात आली आहे, तर अनेक खेळाडूंना धक्का बसला आहे. या रिटेंशनमध्ये दोन मोठे खेळाडू १०० कोटी क्लबचा भाग बनले आहेत. या कामगिरीची नोंद CSK चा सुरेश रैना (Suresh Raina) आणि RCB चा एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) यांच्या नावावर झाली आहे. या १०० कोटींच्या क्लबमध्ये कोणते खेळाडू सहभागी आहेत आणि IPL मध्ये त्यांनी किती कमाई केली आहे ते जाणून घ्या.

१. एसएस धोनी

IPL मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी आहे. गेल्या वर्षी धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता.

तथापि त्याने हे स्पष्ट केले होते की सन २०२१ मध्ये तो आयपीएलचा भाग असेल.IPL मधून धोनीने आतापर्यंत १३७.८ कोटी रुपये कमावले आहेत आणि असा करणारा तो पहिला खेळाडू आहे.

२. रोहित शर्मा

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा IPL चा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. २०२० चा IPL जिंकताच त्याने विक्रमी ५ विजेतेपद जिंकले.

या यादीत रोहित दुसर्‍या क्रमांकावर आहे. IPL मधून त्याची आतापर्यंतची कमाई १३१.६ कोटी आहे.

 

३. विराट कोहली

या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली तिसर्‍या क्रमांकावर आहे.

IPL च्या या मालिकेनंतर तो रोहित आणि धोनीसह १३० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. IPL मधून आतापर्यंत विराटची कमाई १२६.६ कोटी आहे.

४. सुरेश रैना

चेन्नई सुपर किंग्जचा सुरेश रैना या मोसमासह १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.

त्याचा पगार ११ कोटी आहे आणि आतापर्यंत त्याने ९९.७ कोटी कमावले होते, परंतु यावर्षी त्याचा समावेश १०० कोटींच्या क्लबमध्ये होईल.

 

५. एबी डीविलियर्स

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा एबी डीविलियर्स हा १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा पहिला परदेशी खेळाडू आहे.

त्याचा पगार ११ कोटी आहे आणि तो या हंगामात या क्लबमध्ये सामील होईल. तर त्याची कमाई १०२.५१ होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER