आयपीएलचे वेळापत्रक जाहीर

Vivo IPL

इंडियन प्रिमीयर लिगचे (IPL 2020), बहुप्रतीक्षित वेळापत्रक (Time table) अखेर जाहीर झाले आहे. त्यानुसार सलामीचा सामना १९ सप्टेंबर रोजी गतविजेते मुंबई इंडियन्स (MI) आणि माजी विजेते चेन्नई सुपर किंग्ज (CSK) या माजी विजेत्यांमध्ये होणार आहे. यंदाची स्पर्धा यूएईमध्ये खेळली जाणार आहे. सलामी सामना अबुधाबी येथे होईल.

मुंबईचाच संघ साखळीचा अंतिम सामना ३ नोव्हेंबर रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळेल. दुबईत पहिला सामना २० रोजी दिल्ली कॅपिटल आणि किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध होईल. सोमवार २१ रोजी सनरायाझर्स व रॉयल चॅलेंजर्स असा सामना होईल. शारजात पहिला सामना २२ रोजी राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान होणार आहे.

या स्पर्धेत १० वेळा एकाच दिवशी दोन सामने होणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. सामने दुबई, अबुधाबी व शारजा येथे संध्याकाळी ७.३० वा. होतील. दुपारचा सामना ३.३० वा.होईल. दुबईत २४, शारजात १२ आणि अबुधाबीत २० साखळी सामने होणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER