आयपीएलमध्ये जर-तरचा खेळ सुरुच

IPL 2020

आयपीएल 2020 (IPL 2020) च्या साखळी फेरीचे आता फक्त चारच सामने बाकी आहेत पण अजूनही तीन स्थानांसाठी सहा संघ स्पर्धेत आहेत. दिल्ली कॕपिटल्स (DC) आणि राॕयल चॕलेंजर्स बंगलोरच्या (RCB) पराभवांनी आणि सनरायजर्सच्या (SRH) विजयाने अजुनही चूरस कायम ठेवली आहे.

दिल्ली व बंगलोरच्या मोठ्या पराभवांनी पंजाबसाठी आशा निर्माण केल्या आहेत कारण त्यांचा नेट रन रेट या दोन्ही संघांपेक्षा आता चांगला आहे पण दिल्ली व बंगलोरचे 14-14 गूण आहेत तर पंजाबचे 12…त्यामुळे शेवटच्या सामन्यात त्यांना चेन्नईवर विजय मिळवावाच लागणार आहे.सोमवारी दिल्ली आणि बंगलोरचा सामना होईल पण पंजाबने रविवारी चेन्नईवर विजय मिळवला तर सोमवारचा सामना कुणीही हरो, त्या संघापेक्षा ते वरच राहतील. सोमवारचा सामना जिंकणाऱ्या संघाचे 16 गूण होणार असून ते प्ले आॕफसाठी पात्र ठरणार आहेत.

सनरायजर्स हैदराबादचे 12 गूण आणि नेट रनरेट चांगला आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यात जर ते जिंकले तर त्यांची आगेकूच निश्चित म्हणता येईल. अशा स्थितीत किंग्ज इलेव्हनला आपला नेट रनरेट राजस्थान राॕयल्स व कोलकाताच्या संघांतील विजेत्यापेक्षा अधिक ठेवावा लागेल.

पंजाबने रविवारी 180 धावा केल्या आणि एका धावेने विजय मिळवला तर राजस्थान राॕयल्सला 180 धावा केल्यावर 65 धावांनी विजय मिळवावा लागेल किंवा पाठलाग करताना 160 धावांचे आव्हान असेल तर 13 षटकांच्या आत सामना जिंकावा लागेल. कोलकात्यासाठी हेच टारगेट एकतर 85 धावा किंवा 9.3 षटके असणार आहे.

राजस्थान राॕयल्सचे 12 गूण आहेत पण त्यांचा नेट रनरेट कमी आहे पण कोलकातापेक्षा बरा आहे. त्यामुळे सनरायजर्स व पंजाबचे संघ शेवटचा सामना हारले आणि राजस्थानने कोलकात्यावर विजय मिळवला तर त्यांचा मार्ग सरळ आहे. पण या दोघांपैकी एक संघ जरी जिंकला तरी नेट रन रेटवर गोष्ट येणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा नेट रनरेट सर्वात खराब आहे. त्यामुळे 12 गुणांसह त्यांचा मार्ग सर्वात कठीण आहे. राजस्थान राॕयल्सवर विजय तर मिळवावाच लागाणार आहे शिवाय सनरायजर्स व पंजाबचे पराभव आवश्यक आहेत. त्यांना किमान 75 धावांच्या फरकाने सामना जिंकावा लागणार आहे.

बंगलोरचे 14 गूण आहेत आणि दिल्लीविरुध्दचा विजय त्यांना प्लेआॕफमध्ये,नेईल मात्र हरले तर आणि सनरायजर्स व पंजाब जिंकले तर बंगलोरला गाशा गुंडाळावा लागू शकतो. या दोघांपैकी एक हरले आणि राजस्थान व केकेआरच्या निकालाचे,अंतर कमी राहिले तर त्यांना आशा आहेत.

शेवटचे चार सामने गमावून दिल्लीने स्वतःला संकटात,आणून ठेवले आहे. पराभव तर ठीक पण मोठ्या फरकाने सामने गमावून दिल्लीने पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. त्यांचे गूण 14 असले तरी नेट रनरेट बंगलोरापेक्षा कमी आहे. त्यामुळे केवळ विजयच त्यांना सुरक्षित ठेवू शकतो..

सनरायजर्सचा 12 गुणांसह नेट रनरेट सर्वात चांगला आहे,पण त्यांचा शेवटचा सामना बलाढ्य मुंबईशी आहे. मुंबईवर विजय मिळवला तर त्यांना इतर समीकरणांची गरज नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER