IPL Qualifier 2: मार्कस स्टोईनिसच्या संघाला सल्ला, म्हणाला- हैदराबादचे हे तीन खेळाडू ठरू शकतात धोकादायक

marcus stoinis

आयपीएल (IPL) २०२० च्या दुसर्‍या पात्रता सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना फॉर्मात असलेल्या सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हैदराबाद संघाने अखेरचे शेवटचे चार सामने जिंकले आहेत, तर दिल्लीला पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. या मोसमात बॉल आणि फलंदाजीने दिल्लीकडून चांगली कामगिरी करणाऱ्या मार्कस स्टोइनिसने (Marcus Stoinis) या सामन्यात संघासाठी धोकादायक सिद्ध होणार्‍या हैदराबादच्या तीन खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.

मार्कस स्टोइनिसने हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी सांगितले की, ‘मला वाटते आम्ही योग्य आहोत. आम्हाला न घाबरता क्रिकेट खेळण्याची गरज आहे आणि ही आमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. तो एक मजबूत संघ आहेत, परंतु मला वाटते की आम्ही चांगले क्रिकेट खेळल्यास आम्ही जिंकू. हैदराबाद हा एक मजबूत संघ आहे आणि त्यांच्याकडे काही मजबूत फलंदाज देखील आहेत, काही फॉर्ममध्ये असलेले खेळाडू आहेत तर काही गोलंदाजही आहेत, त्यामुळे हा एक चांगला सामना होणार आहे.

स्टॉयनिसने हैदराबादमधील तीन सर्वात धोकादायक खेळाडूंची नावे नोंदवली आणि ते म्हणाले, ” मला वाटते की राशिद खान खरोखरच एक चांगला गोलंदाज आहे, हे सर्वांना माहित आहे. या सामन्यात तो धोकादायक ठरेल आणि हैदराबाद संघासाठी हा खूप महत्वाचा खेळाडू असेल. त्यांच्याकडे डेव्हिड वॉर्नर आणि केन विल्यमसन आहेत जे उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि त्यांनी बर्‍याचदा संघाला विजय मिळवून दिला आहे. स्वत: च्या कामगिरीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे संघाचा विजय होय आणि ते या सामन्यात हातभार लावण्यासाठी प्रयत्न करतील, असेही स्टोनिस म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER