IPL : इतर प्रदेशिक भाषांप्रमाणे मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन द्या; मनसेचा डिस्ने हॉटस्टारला इशारा

Raj Thackeray-Disney Hotstar

मुंबई :  अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये (Amazon App) मराठीचा समावेश करण्यासंदर्भातील मोहिमेनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने डिस्ने हॉटस्टारलाही इशारा दिला आहे. आयपीएलदरम्यान सामन्यांचे समालोचन मराठीमध्ये करण्यात यावे यासाठी मनसेने (MNS) डिस्ने हॉटस्टार ( Disney hotstar) कंपनीला पत्र पाठवलं आहे.

हॉटस्टार डिस्नेच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) इतर प्रदेशिक भाषांप्रमाणे मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी करणारे पत्र मनसेने कंपनीला पाठवलं आहे. सध्या आयपीएलचे समालोचन हिंदी, इंग्रजी, तेलगु, कानडी आणि बंगाली भाषेमध्ये उपलब्ध असून अ‍ॅपमध्ये मराठीचा पर्याय देण्यात आलेला नाही असं मनसेनं म्हटलं आहे. आपल्या कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. त्याचप्रमाणे आयपीएलचा मोठा प्रेक्षक वर्ग हा मराठी आहे असं असतानाही तुम्हाला मराठीचा विसर पडल्याचे दिसत आहे, अशा शब्दात मनसेने कंपनीला सुनावले आहेत.

आयपीएलचा यंदाचा हंगाम संपण्याआधी कंपनीने मराठी भाषेमध्ये समालोचन ऐकण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी विनंती या पत्रामध्ये मनसेने केली आहे. तसेच पत्राच्या शेवटी कंपनीने वेळेत यासंदर्भात निर्णय घेतला नाही तर ‘मनसेच्या प्रचलित पद्धतीने आंदोलन करावे लागेल व त्यामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी,’ असंही मनसेनं म्हटलं आहे. “आय.पी.एल.क्रिकेट सामान्यांची कॉमेंट्री मराठीत करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही आवश्यक ते सहकार्य करू,पण नुसतीच चालढकल केलीत तर महाराष्ट्र सैनिकांशी गाठ आहे हे लक्षात असु द्या..”, असे लिहीत केतन यांनी ट्विटरवरुन पत्र शेअर केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER