IPL चे सामने खेळले जातील, पण ‘या’ गोष्टींची कमतरता जाणवेलच!

IPL 2021

बीसीसीआयनं (BCCI) त्यांच्या सर्व अडचणींतून मार्ग काढत आय.पी.एल.-१४ चे उर्वरित सामने खेळवणार आहे. कोरोनानं (Corona) आय.पी.एल. संघातील बऱ्याच जणांना बाधित केलं. अनेक खेळाडू आणि कर्मचाऱ्यांचा यात सामावेश होता. त्यामुळं आय.पी.एल.चे सामने थांबवणे हाच त्यांच्यासमोरचा एकमेव पर्याय शिल्लक उरला होता. यामुळं आय.पी.एल. स्थगित करण्यात आली. आता १८ स्प्टेंबरनंतर संयुक्त अरब इमिरातमध्ये हे सामने परत भरवले जाणार असून १० ऑक्टोबरला फायनल खेळावी लागणार आहे. पुन्हा आय.पी.एल. सुरू होणार ही आनंदाची बाब असली तरी अनेक खेळाडूंना त्यावेळी सामने खेळता येणार नसल्यामुळं आवडते खेळाडू प्रेक्षकांना त्यांच्या टीममध्ये पाहता येणार नाही. यामुळं आय.पी.एल.च्या आनंदावर विरजण पडेल की काय? असा प्रश्न निर्माण झालाय.

आयोजनाचं अर्थकारण
ऑक्टोबर महिन्यात टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलंय. आय.पी.एल.च्या नियोजनातला हा सर्वांत मोठा अडसर आहे. आयसीसीआयलासुद्धा याची पुरेपूर कल्पना आहे. असं असलं तरी बीसीसीआयने आय.पी.एल.मध्ये गुंतवलेले २५०० कोटी रुपये कसे भरून निघतील याकडं लक्ष केंद्रित केलं. त्यामुळं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिलं की, “विदेशी खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळं काही फरक पडणार नाही. आमचा फोकस सामन्यांचे आयोजन करण्यावर आहे.” त्यामुळं आधीच विश्वचषकासाठी प्रशिक्षण घेता यावं म्हणून परदेशी क्रिकेट संघटनांनी त्यांच्या खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी आखलेल्या कार्यक्रमात खेळाडूंना सहभागी व्हावं लागणार आहे. असं असताना विश्वचषकाच्या एक महिनाआधी आय.पी.एल.चं केलं जाणारं नियोजन संभ्रम निर्माण करणारं आहे.

तर पोलार्ड आय.पी.एल.मध्ये खेळताना दिसणार नाही
आयपीलएलच्या सामन्यांना रंग चढवाता ते वेस्ट इंडीजचे खेळाडू आजपर्यंतच्या १४ आय.पी.एल. हंगामांमध्ये जीव ओतायचं काम या खेळाडूंनी केलं. यंदाच्या मौसमातही त्यांनी तुफान प्रदर्शन केलं. मुंबई इंडियन्सच्या केरॉन पोलार्डची चेन्नई सुपरकिंग विरुद्धची खेळी तर अजूनही लोक विसरले नाहीत. त्या सामन्यानंतर आय.पी.एल.चे सामने पुढे ढकलले गेले. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर आय.पी.एल.चे सामने खेळवले जणार आहेत. तेव्हाच वेस्ट इंडीजमधली ‘कॅरेबियन प्रिमियर लीग’ सुरू होणार आहे. २८ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर या दरम्यान ही लीग खेळवली जाणार असल्यामुळं वेस्ट इंडीजचे खेळाडू यंदाच्या आय.पी.एल.पासून दूर राहतील, असे कयास लावले जात आहेत. असं झालं तर ख्रिस गेल, केरॉन पोलार्ड, आंद्रे रसेल, निकोलस पुरन आय.पी.एल.पासून दूर राहतील अशी चिन्हे आहेत. बीसीसीआयनं यावर उपाय म्हणून वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघटनेला ‘कॅरेबियन लीग’ ठरल्या तारखेच्या १० दिवस आधी सुरू करण्याची विनंती केली आहे.

विदेशी खेळाडूंच्या अनुपस्थितीचा कुणाला बसेल फटका?
विदेशी खेळाडू जर आय.पी.एल.पासून दूर राहिले तर याचा सर्वाधिक फटका राजस्थान रॉयल्स आणि कोलकात्ता नाईट रायडर्स या दोन टीम्सना बसणार आहे. हे दोन्ही संघ आधीपासूनच सहा पाइंट्सनं मागे आहेत. कोलकात्याबद्दल बोलायचं तर इंग्लंड संघाचा कर्णधार इऑन मार्गनच आय.पी.एल.साठी उपस्थित राहू शकणार नाही, त्यामुळं त्यांना नवा कर्णधार निवडावा लागेल; शिवाय पॅट कमिन्सने पुढं येऊन खेळ्यास नकार दिलाय तर बांग्लादेश क्रिकेट बोर्डानं साकिबला आय.पी.एल. खेळण्यासाठी पाठवणार नसल्याचं स्पष्ट केलं. सुनील नारायण आणि आंद्रे रसेल हे दोन तगडे वेस्ट इंडीजचे खेळाडू कॅरेबियन प्रीमअर लीगमुळं खेळण्यास कोलकाताकडून खेळण्यास नकार देऊ शकतात. त्याचा तोटा कोलकाता नाईट रायडर्सला होऊ शकतो.

राजस्थान रॉयल्सला जोफ्रा आर्चर, बेन स्ट्रोक्स आणि जोस बटलर याशिवाय आय.पी.एल.मध्ये टिकून राहणं अशक्य बनलंय. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सन रायजेज हैदराबादमध्येही अशीच परिस्थिती आहे. पंजाबनं आठ सामन्यांपैकी फक्त तीन सामने जिंकत सहा गुण पटकवले आहे. तर सनराइजेज हैदराबादची गाडी आधीच रुळावरून उतरली आहे. स्थानिक आणि नवख्या खेळाडूंना संधी देऊन उत्तम प्रदर्शन करणाऱ्या दिल्ली कॅपिटल या संघाला याचा फटका सर्वांत कमी बसणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सनं पहिल्या टप्प्यात आठपैकी सहा सामने जिंकून १२ पॉइंट्स घेतले आहेत. त्यांच्या संघांत विदेशी खेळाडूंचा भरणा इतका जास्त नसल्यामुळं आणि पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर असल्यामुळं दिल्ली कॅपिटल या संघाकडे यंदाचं विजेतेपद येऊ शकतं, असे अंदाज बांधले जात आहेत. कोरोना आणि विश्वचषकाची तयारी या दोन्ही समस्यांमुळं आय.पी.एल.ची मजा ओसरू नये, अशीच इच्छा क्रिकेटप्रेमींची आहे. सदरील माहिती पुस्तक, वर्तमान, इंटनेटवरील स्रोतांमधून संकलित केलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button