आयपीएलचे मुंबईतील सामने ठरल्याप्रमाणेच होणार : सौरव गांगुली

Maharashtra Today

महाराष्ट्र सरकारने कोरोना (Corona) आटोक्यात आणण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घातले असले तरी आणि देवदत्त पडिक्कल व अक्षर पटेलसारखे खेळाडू बाधीत असल्याचे समोर आले असले तरी आयपीएल 2021 (IPL 2021). चे सामने ठरल्याप्रमाणेच होतील आणि मुंबईतील (Mumbai) सामनेही इतरत्र हलवले जाणार नाहीत असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly)यांनी स्पष्ट केले आहे. आयपीएल 2021 च्या सामन्यांना नऊ एप्रिलपासून सुरुवात होत आहे.

सौरव गांगुली यांनी असे म्हटले असले तरी हैदराबाद व इंदूर यांना राखीव मैदाने म्हणून मानले जात आहे. मुंबईत (Mumbai) सामने होऊच शकले नाहीत तर याठिकाणी ते सामने आयोजनाचा विचार होणार आहे. हैदराबाद क्रिकेट संघटनेने अशी तयारी दाखवलेली आहे.

महाराष्ट्र सरकारने घातलेल्या कडक निर्बंधानुसार धार्मिक स्थळे, व्यायाम शाळा, मनोरंजक केंद्र व उद्याने, बंदिस्त क्रीडा संकुले, मैदाने, समुद्रकिनारे, केश कर्तनालय व ब्युटी सलून दिवसा बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र क्रिकेटपटू हे अतिशय कडक बायो बबलमध्ये राहणार असल्याने सामने मुंबईबाहेर हलवले जाणार नाहीत असे बीसीसीआयने सुचवले आहे. आतापर्यंत पडक्कल व अक्षरसह आयपीएलशी संबंधीत 19 जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे दिसून आले आहे.

सध्या दिल्ली कॕपिटल्स, राजस्थान राॕयल्स, पंजाब किंग्ज व चेन्नई सुपर किंग्ज हे चार संघ मुंबईत सराव करत आहेत. ब्रेबोर्न स्टेडियम, बांद्रा कुर्ला काॕम्प्लेक्स आणि डी.वाय.पाटील स्टेडियम येथे त्यांचा सराव सुरू आहे.

या संघांचा सध्यातरी आयपीएलचे सामने होणार असलेल्या वानखेडे स्टेडीयमशी संपर्क व संबध नसल्याने चिंतेचे कारण नाही. सर्व जण व्यवस्थित व सुरक्षित राहतील याची आम्ही काळजी घेऊ असे मुंबईतील तयारीवर नजर राखून असलेल्य बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

मुंबईत पहिला सामना 10 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॕपिटल्सदरम्यान होणार आहे. मुंबईतील सामने शेवटच्या क्षणी इतरत्र हलवणे अडचणीचे ठरणार असल्याचे फ्रँजाईजींनीसुध्दा म्हटले आहे पण बीसीसीआयने इंदूर व हैदराबादलाही राखीव म्हणून ठेवले आहे. हैदराबाद क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद,अझहरुद्दीन यांनी त्यांची संघटना अशा आयोजनास तयार असल्याचे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button