IPL KXIP vs RR: विजयानंतर सामनाचा नायक राहुल तेवतियाने काय म्हटले ते जाणून घ्या

Rahul Tewatia

राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) १८ व्या षटकात ५ षटकार मारत सामना पूर्णपणे पलटवला आणि राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

राहुल तेवतियने रविवारी तो डाव खेळला ज्या खेळीनी राजस्थान रॉयल्सला (RR) पराभवाच्या जोरावर विजय मिळवून दिला. IPL मधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करत किंग्ज इलेव्हन पंजाबने (KXIP) राजस्थानसमोर २२४ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

संजू सॅमसन (८५) आणि स्टीव्ह स्मिथ (५०) यांनी जोस बटलरच्या बाद झाल्या नंतर वेगवान धावा करत संघाला विजयाच्या मार्गावर आणले. स्मिथ बाद झाल्यानंतर आलेल्या राहुल तवेटियाने सुरुवातीला खूपच धीमा डाव खेळला ज्यामुळे संघ पराभवाच्या जवळ पोहचला परंतु १८ व्या षटकात तेवतियाने ५ षटकार ठोकत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले आणि अशा प्रकारे एका वेळी खलनायक बनलेल्या तेवतिया राजस्थानचा नायक बनला.

सामन्यानंतर तेवतिया म्हणाला, ‘मला आता बरे वाटले आहे. सुरुवातीचे २० चेंडू माझ्या कारकीर्दीतले सर्वात वाईट चेंडू होते. यानंतर मी फटके मारण्यास करण्यास सुरवात केली. डगआऊटला माहित होतं की मी चेंडू मारू शकतो. मला माहित आहे की मला माझ्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. हे फक्त एक षटकार मारण्याची गोष्ट होती. एका षटकात ५ षटकार हे विलक्षण होते. मी लेग स्पिनरला मारण्याचा प्रयत्न केला, पण मारता आला नाही. त्यामुळे मला इतर गोलंदाजांना मारावे लागले.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER