IPL: नॉकआउट मध्ये पुन्हा फ्लॉप झाला कोहली, फैंसने लावली क्लास

Virat Kohli

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या (SRH) एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची (RCB) फलंदाजी पूर्ण फ्लॉप ठरली. बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही, ज्यामुळे तो पुन्हा एकदा सोशल मीडियावरील चाहत्यांच्या निशाण्यावर आला.

या सामन्यात बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली सलामीसाठी आला आणि ७ चेंडूत ६ धावांवर बाद झाला. मोठ्या सामन्यात कोहलीची फलंदाजी पाहून चाहत्यांनी ट्विटरवरुन त्यांचा राग काढला आहे. नॉकआउट सामन्यात विराट कोहलीचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. हैदराबादविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात स्वस्तात बाहेर आल्याने चाहते त्याची खिल्ली उडवत आहेत.

एबी डिव्हिलियर्स (५६) ने बेंगळुरूकडून अर्धशतक झळकावले, पण रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध भक्कम धावसंख्या गाठता आली नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांत ७ गडी गमावून १३१ धावा केल्या.

प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद संघाने १९.४ षटकांत १३२ धावा करत विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ गडी राखून पराभव करून क्वालिफायर -२ मध्ये स्थान मिळवले. क्वालिफायर -२ मध्ये हैदराबादचा सामना ८ नोव्हेंबरला दिल्लीशी होणार आहे.

हैदराबादकडून केन विल्यमसनने सर्वाधिक ५० धावा केल्या तर मनीष पांडे आणि जेसन होल्डरने २४-२४ धावा केल्या.

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादचा सामना ८ नोव्हेंबरला क्वालिफायर -२ मध्ये दिल्लीशी होणार आहे. क्वालिफायर -२ मध्ये जिंकणारी टीम अंतिम फेरी गाठेल. क्वालिफायर -२ मधील विजेत्या संघाचा सामना १० नोव्हेंबरला मुंबई इंडियन्सशी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER