IPL इतिहास : जेव्हा ईशांत शर्माने दोन षटकांत बाद केले होते पाच गडी

Ishant Sharma

यावेळी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार्‍या वेगवान गोलंदाजाने केली होती उत्कृष्ट कामगिरी. आयपीएलमधील टॉप -५ गोलंदाजांपैकी तो एक होता.

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) १३ वा हंगाम संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) भूमीवर १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघात खेळणारा ईशांत शर्मा पुन्हा या लीगमध्ये परतला आहे. पण तुम्हाला माहिती आहे काय की आयपीएलच्या टॉप -५ गोलंदाजांपैकी एक उत्कृष्ट कामगिरी ईशांत शर्माच्या नावावर नोंदली गेली आहे? ईशांतच्या या भेदक गोलंदाजीच्या कामगिरीवर एक नजर टाकू या.

कोची टस्कर्स विरुद्ध होता सामना
२०११ च्या आयपीएलच्या मोसमात ईशांत शर्मा डेक्कन चार्जर्सकडून खेळत होता, जो आयपीएलच्या इतिहासातील परदेशी भूमीवर विजेतेपद जिंकणारा एकमेव संघ आहे. डेक्कनचा सामना आयपीएलच्या चौथ्या सत्रात २७ एप्रिल २०११ रोजी कोची टस्कर्स केरळविरुद्ध होता. विशेष म्हणजे आता या दोन्ही फ्रँचायझी आयपीएलमधून काढून घेण्यात आल्या आहेत. बरं तेव्हा दोघांचा सामना होता कोचीच्या नेहरू स्टेडियमवर.

डेक्कनने केली होती प्रथम फलंदाजी
कोची संघाने नाणेफेक जिंकून डेक्कन चार्जर्सला प्रथम फलंदाजीची संधी दिली. विकेटवर काही प्रमाणात आर्द्रता होती, त्याचा फायदा गोलंदाजांना झाला आणि कोचीच्या गोलंदाजांसमोर डेक्कनला २० षटकांत ७ बडी गमावून १२९ धावा करता आल्या. कुमार संगकारा आणि कैमरुन व्हाइट या दोन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. संगकाराने ६५ धावा आणि व्हाईटने ३१ धावा केल्या होत्या.

पहिल्याच षटकात कोचीची फलंदाजी नष्ट केली ईशांतने
कोची टस्कर्सची फलंदाजी सुरू होताच डेल स्टेनने पहिली विकेट घेतली. यानंतर ईशांतने कहर केला. दुसर्‍या षटकात आलेल्या ईशांतने दुसर्‍या चेंडूवर पार्थिव पटेलला शून्यावर बाद केले. पुढच्याच चेंडूवर ईशांतने आरवी गोम्जला शून्यावर बाद केले. ब्रैड हॉजने ईशांतची हॅटट्रिक होऊ दिली नाही; परंतु पुढच्याच चेंडूवर ईशांतनेही त्यालाही शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परत केले. ईशांतने ४ चेंडूंत ३ गडी बाद करून कहर केला होता. कोचीची धावसंख्या २ धावांत ४ विकेट होती.

डावाच्या चौथ्या षटकात परत आलेल्या ईशांतने पहिल्याच चेंडूवर केदार जाधवची विकेट घेतली आणि त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेचा दिग्गज महेला जयवर्धनेही पवेलियनमध्ये परतला आणि ११ धावांत ६ बाद अशी धावसंख्या झाली होती. ईशांतने केवळ ११ चेंडूंत ५ गडी बाद केले होते. शेवटी कोचीची टीम ७४ धावांवर कोसळली. ईशांतचा आकडा होता ३ षटकांत १२ धावा देऊन ५ विकेट. या गोलंदाजीसाठी ईशांतला ‘सामनावीर’ म्हणून निवडले गेले होते.

तेव्हा ही आयपीएलमधील तिसरी सर्वोत्कृष्ट कामगिरी होती
त्यावेळी ईशांतची गोलंदाजी आयपीएलच्या इतिहासातील तिसरी सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. त्याआधी पाकिस्तानच्या सोहेल तन्वीरने आयपीएल २००८ मध्ये १४ धावा देऊन ६ बळी घेतले होते तर लेगस्पिनर अनिल कुंबळेने आयपीएल २००९ मध्ये ५ धावा देऊन ५ बळी घेतले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER