IPL इतिहास: या भारतीय खेळाळूच्या नावावर आहे सर्वात वेगवान अर्धशतकचे विक्रम

KL Rahul

IPLच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम IPLचा सर्वात धासू फलंदाज केएल राहुलच्या नावावर नोंदला गेला आहे. राहुलने दिल्ली कैपिटल्स विरुद्ध हा पराक्रम केला होता.

इंडियन प्रीमियर लीग २०२० (IPL २०२०) सुरू होण्यास फारसा वेळ शिल्लक नाही. यंदा IPLचा १३ वा हंगाम संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) खेळला जात आहे. अशा परिस्थितीत या IPLमध्ये कोणता फलंदाज सर्वात धोकादायक ठरू शकतो यावर जर आपण चर्चा केली तर त्यापैकी एक केएल राहुल आहे. IPLच्या दोन मोसमात राहुलने यापूर्वी ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. एवढेच नव्हे तर या स्पर्धेतील वेगवान अर्धशतकही राहुलच्या नावे नोंदवले गेले आहे. जे त्याने दिल्ली कैपिटल्स विरुद्ध केले होते.

राहुलने अवघ्या १४ चेंडूत पूर्ण केले होते अर्धशतक

IPL ११ दरम्यान किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP vs DC) आणि दिल्ली कैपिटल्समध्ये सामना खेळला गेला होता. मोहालीच्या आय एस बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत कर्णधार गौतम गंभीरच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीच्या संघाने २० षटकांत १६७ धावांचे लक्ष्य KXIP दिले होते. १६७ धावांचा पाठलाग करताना पंजाबची केएल राहुल आणि मयंक अग्रवालची जोडी मैदानावर आली. राहुल जणू ड्रेसिंग रूममधूनच सेट होऊन आला होता आणि येताच त्याने दिल्लीच्या गोलंदाजांना रिमांडवर घेण्यास सुरुवात केली. केएल राहुलने आपल्या ज्वलंत फलंदाजीमुळे दिल्लीच्या गोलंदाजांना धुवून काढले. आलम असा होता की जेव्हा मयंकच्या रूपात ७ धाव करून पंजाबची पहिली विकेट ३.४ षटकांत पडली, त्यावेळी राहुलने ५० धावा पूर्ण केल्या होत्या, जे त्याने फक्त १४ चेंडूत केले होते. IPLच्या इतिहासात इतक्या कमी चेंडूंमध्ये पन्नास धावा करणारा एकमेव फलंदाज राहुल आहे. केएल राहुलने या सामन्यात १६ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५१ धावा फटकावल्या होत्या, ज्याच्या मदतीने पंजाब दिल्लीला 6 गडी राखून पराभूत करण्यात यशस्वी ठरला.

IPL मध्ये केएल राहुलच्या नावावर आहे १ शतक आणि १६ अर्धशतक

केएल राहुल सध्या या लीगच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे, कारण IPL मधील राहुलची आकडेवारी या वस्तुस्थितीची स्पष्टपणे साक्ष देते. केएल राहुलने आतापर्यंतच्या IPL कारकिर्दीतील ६७ सामन्यांत ४२.०६ च्या उत्कृष्ट सरासरीने १९७७ धावा केल्या आहेत. तसेच राहुलने १ शतक आणि १६ अर्धशतकेही केली आहेत. तर केएल राहुलचा स्ट्राइक रेट १३८.१५ आहे. तुम्हाला सांगूया की यावेळी राहुल हा किंग्ज इलेव्हन पंजाबचा(KXIP) कर्णधार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER