IPL इतिहास: तर धोनी नाही हा खेळाडू असता चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार!

Dhoni

टीम इंडियाचा माजी फलंदाज एस बद्रीनाथने नुकताच खुलासा केला आहे की सन २००८ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (CSK)कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) ही पहिली पसंती नव्हती.

IPLचा इतिहास १२ वर्ष जुना आहे. या दरम्यान इतिहासातील पाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू सुब्रमण्यम बद्रीनाथने पुन्हा उघडली आहे आणि एक खुलासा केला ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. IPL फ्रँचायझी CSKचा माझी फलंदाज एस. ब्रिडीनाथने सांगितले की जगातील सर्वात मोठी लीगच्या पहिल्या आवृत्तीदरम्यान महेंद्रसिंग धोनी हा CSK टीम मॅनेजमेंटची पहिली पसंती नव्हती, तर CSK साठी कर्णधार म्हणून दुसरा भारतीय खेळाडू निवडलेला जाणार होता.

कर्णधार म्हणून वीरेंद्र सेहवाग होता CSK ची पहिली पसंती – एस बद्रीनाथ

नुकत्याच झालेल्या एका मीडिया मुलाखती दरम्यान एस. बर्डिनाथने असं सांगितले आहे कि २००८ मध्ये धोनीऐवजी CSK चे टीम मैनेजमेंट वीरेंद्र सेहवागला संघात कर्णधार म्हणून समाविष्ट करण्याचा विचार करीत होता. CSK टीम मैनेजमेंटला भारताचा सलामीवीर वीरेंद्र सेहवागला चेन्नईचा कर्णधार बनवायचा होता, असे बर्दीनाथ यांनी सांगितले आहे.

जेव्हा संघाचे मालक एन श्रीनिवासन यांना समजले की सेहवाग दिल्लीहून खेळण्यास उत्सुक आहे. तर त्यानंतर त्यांनी महेंद्रसिंग धोनीच्या नावाचा विचार केला आणि भारतीय रुपयाअंतर्गत सुमारे ६ कोटी रुपयांत त्याला विकत घेतले, म्हणजे अमेरिकन डॉलरची किंमत १.५ दशलक्ष. कारण एका वर्षापूर्वी २००७ मध्ये टीम इंडिया माहीच्या नेतृत्वात टी -२० वर्ल्ड कप चॅम्पियन बनली होती. त्याच वेळी धोनी त्या काळातील सर्वात वेगवान फायर फिनिशर म्हणून स्थापित झाला होता. त्यामुळे धोनीचा CSK मध्ये समावेश झाला होता.

धोनीच्या नेतृत्वात CSK बनला ३ वेळा IPL चॅम्पियन बनला

बद्रीनाथच्या या प्रकटीकरणाचा विचार केला तर CSK हा IPL चा सर्वात यशस्वी संघ ठरला नसता. यात काहीच संशय नाही कि माही शिवाय CSKची कल्पना थोडी अवघड आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात CSK संघ ३ वेळा IPL चॅम्पियन आणि २ वेळा चॅम्पियन्स लीग विजेता ठरला आहे. IPL च्या इतिहासात माहीची सेना ही एकमेव अशी टीम आहे जी आतापर्यंतच्या स्पर्धेच्या सर्व मोसमात प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे.

ही बातमी पण वाचा : मैच फिक्सिंगमुळे क्रिकेट पुन्हा लाजिरवाणा, ICC ने या संघातील दोन खेळाडूंना केले निलंबित

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER