IPL इतिहास: पदार्पणाच्या सामन्यात “या” ४ गोलंदाजांनी घेतले आहेत सर्वाधिक विकेट्स

IPL

IPL च्या इतिहासात असे ४ गोलंदाज झाले आहेत ज्यांनी IPL मध्ये पदार्पण करताना सर्वाधिक विकेट्स घेत अनोखा विक्रम नोंदविला आहे.

IPL २०२० चा कारवां येत्या १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या टी -२० लीगवर सर्व क्रिकेट चाहत्यांचे डोळे आहेत. यादरम्यान, आपण येथे IPL च्या इतिहासाबद्दल चर्चा करूया आणि ही चर्चा IPL डेब्यू सामन्यात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांवर असेल. या लेखाच्या माध्यमातून जाणून घ्या की ते कोणते ४ गोलंदाज आहेत ज्यांनी आपल्या गोलंदाजीने IPL मधील पदार्पण सामन्यात ठसा उमटविला.

१- शोएब अख्तर (Shoaib Akhtar)

पाकिस्तानचा सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने २००८ च्या IPL च्या पहिल्या आवृत्तीत (IPL -१) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) साठी पहिला सामना खेळला होता. शोएब अख्तरने या सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी सादर करत दिल्ली डेअरडेव्हिल्स (DD) विरुद्ध ११ धावा देऊन ४ बळी घेतले होते. अशाप्रकारे अख्तरने IPL च्या डेब्यू सामन्यात आपला ठसा उमटविला.

२- शादाब जकाती (Shadab Jakati)

IPL चे विजेतेपद ३ वेळा जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून २००९ च्या IPL मध्ये पदार्पण करणारा भारताचा फिरकी गोलंदाज शादाब जकातीनेही पदार्पण सामना संस्मरणीय बनवला आहे. जकातीने IPL च्या दुसर्‍या सत्रात दिल्ली डेअरडेव्हिल्स (DD) चे ४ फलंदाजांना मंडपात पाठविले. IPL च्या पहिल्या सामन्यात शदाबा जकातीने २४ धावांत ४ बळी आपल्या नावावर केले होते.

३- एंड्रयू टाई (Andrew Tye)

ऑस्ट्रेलियाचा सर्वात वेगवान गोलंदाज एंड्रयू टाईने २०१७ च्या आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. एंड्रयू टाईने किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) कडून IPL मधील पहिला सामना खेळत ५ विकेट घेण्याचा अनोखा पराक्रम केला होता. टाईने या सामन्यात रायझिंग पुणे सुपरगिजंट्स विरूद्ध आपली प्राणघातक गोलंदाजी सादर करत १७ धावा देऊन ५ बळी घेतले होते.

४- अल्जारी जोसेफ (Alzari Joseph)

IPL -१२ दरम्यान वेस्टइंडीजचा युवा वेगवान गोलंदाज अल्जारी जोसेफने IPL चा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सच्या वतीने या लीगमध्ये पदार्पण केले. अल्जारी जोसेफने आपल्या पदार्पण सामन्यात IPL च्या इतिहासातील एक नवा अध्याय लिहिला. जोसेफने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पहिल्या सामन्यात १२ धावा देऊन ६ बळी मिळवले होते. अल्जारी जोसेफने या उत्कृष्ट गोलंदाजीखाली पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीरच्या IPL मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा विक्रमही ६-१४ मोडला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER