IPL: दिनेश कार्तिकचा ‘सुपरमॅन कॅच’, बनवला हा विक्रम – पहा व्हिडिओ

कोलकाता नाईट रायडर्सचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिक राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या ‘करो या मारो’ सामन्यात फलंदाजीत फ्लॉप झाला, पण त्याने विकेटच्या मागे एक आश्चर्यकारक झेल पकडत सर्वांना चकित केले. दिनेश कार्तिकने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात विकेटच्या मागे एकूण चार झेल घेतले. यासह तो IPL सामन्यात तीन वेळा चार बळी मिळविणारा पहिला विकेटकीपर बनला आहे.

२००९ मध्ये DD साठी – ४ शिकार (२ झेल, २ स्टंप, विरुद्ध RR)
२०१८ मध्ये KKR साठी – ४ शिकार (३ झेल, १ स्टंप, विरुद्ध RR)
२०२० मध्ये KKR साठी – ४ शिकार (4 झेल, विरुद्ध RR)

IPL मधील सर्वाधिक झेल घेण्याविषयी बोलायच तर, दिनेश कार्तिक ११० कॅचसह टॉपवर आहे. त्याने महेंद्रसिंग धोनीला (१०९) मागे टाकले.

राजस्थान रॉयल्सच्या डावाच्या तिसर्‍या षटकात कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज पॅट कमिन्स गोलंदाजी करायला आला. या दरम्यान राजस्थान रॉयल्सचा फलंदाज बेन स्टोक्स स्ट्राइक होता. तिसर्‍या षटकात पॅट कमिन्सचा पहिलाच बॉल बेन स्टोक्सच्या बॅटची धार घेऊन दिनेश कार्तिक जवळ पोहोचला. दिनेश कार्तिकने सुपरमॅन स्टाईलमध्ये हवेत झेप घेतली आणि बेन स्टोक्सचा अप्रतिम झेल पकडला.

https://www.iplt20.com/video/224993/dk-takes-flight-catch-unbelievable

बेन स्टोक्सची विकेट खूप महत्वाची ठरली. बेन स्टोक्स (१८) बाद झाल्याने राजस्थान रॉयल्सने ताल गमावला. राजस्थान रॉयल्सने ३७ धावांत ५ गडी गमावले होते. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला ‘करो या मरो’ सामन्यात ६० धावांनी हरवून मोठा विजय नोंदविला. कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी १९२ धावांचे लक्ष्य दिले. कोलकाताकडून कर्णधार इयन मॉर्गनने सर्वाधिक ६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्स संघ २० षटकांत १३१ धावा करू शकला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER