IPL: पहिल्याच षटकात निश्चित झाला होता दिल्लीचा पराभव, बोल्ट-बुमराहने असे दिले धक्के

Jasprit Bumrah - Trent Boult

IPL १३ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) घातक गोलंदाजी पाहायला मिळाली जेव्हा ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहने दिल्ली कॅपिटलच्या फलंदाजांवर कहर केला. ट्रेंट बोल्ट (Trent Boult) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांनी अशी घातक गोलंदाजी केली कि ज्यामुळे २०१ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला दिल्ली कॅपिटलचा संघाचा स्कोर ० वर ३ गडी बाद झाला.

पहिल्याच षटकात २ विकेट शून्यवर गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटलने आपला पाया गमावला. पहिल्याच षटकात दिल्ली कॅपिटल संघाला दोन मोठे धक्के बसले. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज ट्रेंट बाउल्टने दिल्ली कॅपिटलचा फलंदाज पृथ्वी शॉ (०) आणि अजिंक्य रहाणेला (०) शून्यावर बाद केला.

यानंतर जसप्रीत बुमराह दुसर्‍या षटकात गोलंदाजीसाठी आला. जसप्रीत बुमराहने धवनला (०) बोल्ड केले आणि दिल्लीचा ० धावावर तीन गडी बाद केले.

मुंबईच्या २०१ धावांच्या उत्तरात दिल्लीचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून १४३ धावा करू शकला. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ गडी बाद केले. ट्रेंट बाउल्टने २ आणि क्रुणाल आणि पोलार्डने १-१ गडी बाद केले. पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटलसचा ५७ धावांनी पराभव करून थेट फायनलमध्ये प्रवेश केला.

यापूर्वी मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावून २०० धावा केल्या आणि दिल्लीच्या समोर क्वालिफायर सामन्यात २०१ धावांचे लक्ष्य ठेवले. मुंबई इंडियन्सकडून ईशान किशनने सर्वाधिक ५५ धावा केल्या तर सूर्यकुमार यादवने ५१ धावा केल्या. शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याने १४ चेंडूत ३७ धावा फटकावल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER