आयपीएल सुरु होताच पाकिस्तानींचा जळफळाट सुरू

Maharashtra Today

आयपीएल (IPL) सुरू होताच आणि आयपीएलची लोकप्रियता बघताच पाकिस्तानी (Pakistan) क्रिकेट रसिकांचा जळफळाट सुरू झाला आहे आणि त्याचे प्रदर्शन ते सोशल मीडियावर करत आहेत. पाकिस्तानातील एक ख्यातनाम आकडेवारी तज्ज्ञ आहेत मझहर अर्शद (Mazhar Arshad) . आयपीएलच्या निमित्ताने ते सामन्यांतील विक्रमांचे ट्विट करत आहेत आणि त्यावर येत असलेल्या काॕमेंटसमधून हा जळफळाट उघड होत आहे.

फहिम मारवत नावाच्या व्यक्तीने म्हटलेय की आम्हाला आयपीएल स्टेटस देण्याची काही गरज नाही. आही पाकिस्तानी आहोत, भारतीय नाहीत. आम्ही आयपीएल बघत नाही असे मीर मुश्ताक याने म्हटले आहे.

एकाने म्हटलेय की 13 वर्षांपूर्वी आयपीएल पाहिले होते आणि तेंव्हाच मला ते बघावेसे वाटले नाही. दानिश अब्दुल रहमानने तर मझहर हे आयपीएलची माहिती देणे सुरु ठेवतील तर त्यांना अनफॉलो करण्याचा इशारा दिला आहे . एकाने म्हटलेय की ज्या लीगमध्ये आमच्या खेळाडूंना बंदी असेल तिची माहिती आम्हाला कशाला हवी? एकाने तर आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने पत्रकारांचे मैत्री बनवण्याचे हे उद्योग असल्याचे म्हटले आहे. राझी याने आगामी दोन महिने तरी मझहरला अनफॉलो करावे लागेल असे म्हटले आहे. कामरान याने धमकी दिली आहे की ‘भाई, इंडिया चला जा..पुन्हा आयपीएलवर ट्विट केलेस तर तुझ्याविरुध्द अनफॉलो मोहिम उघडेन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button