आयपीएल 2021 साठी 11 फेब्रुवारीला लिलावाची शक्यता

IPL Auction Likely to be on 11 Feb

2021 च्या इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल IPL) साठी 11 फेब्रुवारीला खेळाडूंचे लिलाव (Players Auction) होण्याची शक्यता आहे. त्याआधी सर्व आठच्या आठ फ्रँचाईजींना ते कोणते खेळाडू कायम ठेवणार आणि कोणत्या खेळाडूंना मुक्त करणार याची यादी 20 जानेवारीपर्यंत सादर करावी लागणार आहे. आयपीएल संचालन परिषदेच्या सोमवारी झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 2021 च्या आयपीएल स्पर्धेच्या तारखा मात्र अद्याप निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. 2021 च्या सत्रात गेल्या सत्राप्रमाणे आठच संघ असणार आहेत.

11 फेब्रुवारीला होणारे लिलाव कुठे होतील हे अद्याप ठरलेले नाही.,मात्र भारत व इंग्लंड दरम्यानच्या पहिल्या व दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान मिळणाऱ्या काळात हे लिलाव पार पडतील. कोरोनाची अनिश्चित स्थिती बघता पुन्हा एकदा संयुक्त अरब अमिरातीत ही स्पर्धा आयोजीत करता येण्याचा पर्याय कायम ठेवण्यात आला आहे किंवा कमीत कमी ठिकाणी सामने आयोजीत करण्याचाही विचार करण्यात आला आहे. लिलावासाठीच्या फ्रँचाईजींच्या एकूण खर्च मर्यादेत तीन कोटी रुपयांची वाढ केली जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत चेन्नई सुपर किंग्जच्य खात्यात सर्वात कमी म्हणजे 15 लाख रुपये शिल्लक आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या खात्यात सर्वाधिक 16 कोटी 50 लाखांचा निधी आहे. इतर संघांकडील शिल्लक रक्कम पुढीलप्रमाणे : राजस्थान राॕयल्स 14 कोटी 75 लाख, सनरायजर्स हैदराबाद 10 कोटी 10 लाख, दिल्ली कॕपिटल्स 9 कोटी, कोलकाता नाईट रायडर्स 8 कोटी 50 लाख, राॕयल चॕलेंजर्स बंगलोर 6 कोटी 40 लाख आणि मुंबई इंडियन्स 1 कोटी 95 लाख रुपये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER