IPL Auction 2021: प्रीती झिंटाने आर्यन खानला छेडले, ‘आम्हाला शाहरुख मिळाला’

IPL च्या लिलाव २०२१ दरम्यान पंजाब किंग्जची मालकिन प्रीती झिंटाने (Preity Zinta) तमिळनाडूचा क्रिकेटर शाहरुख खानला (Shahrukh Khan) ५.२५ कोटीमध्ये विकत घेतले आणि आनंदाने उडी घेतली.

IPL लिलाव 2021 दरम्यान खेळाडूंच्या खरेदीविषयी बरीच चर्चा रंगली होती. प्रत्येकजण अनुभवी क्रिकेटपटूंना आपल्या संघात समाविष्ट करू इच्छित होता. यावेळी फ्रेंचायझी मालकांमध्ये बिडिंग वॉर देखील पाहिले गेले.

रोचक होता शाहरुखचा लिलाव
तमिळनाडूचा क्रिकेटर शाहरुख खानला ५.२५ कोटीमध्ये खरेदी केल्यानंतर पंजाब किंग्जची मालिका प्रीती झिंटा बरीच खुश दिसत होती. तिने KKR च्या टेबलावर बसलेल्या आर्यन खानकडे बघून छेडले, ‘आम्हाला शाहरुख मिळाला.’

आर्यनने (Aryan Khan) लावली बोली
कोलकाता नाइट रायडर्सच्या वतीने शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान खेळाडूंसाठी बोली लावताना दिसला. त्याने बांगलादेशचा साकिब उल हसन आणि हरभजन सिंग सारख्या दिग्गजांना खरेदी केले. यावेळी तो जूही चावलाची मुलगी जाह्नवी मेहतासमवेत उपस्थित होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER