
ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell) RCB ने विकत घेतले आहे. बरीच मोठी नावे खूप जास्त किंमतीला विकली गेली होती तर कित्येकांना खरेदीदारही मिळाले नाही. इतकेच नव्हे तर काही खेळाडूंनी बऱ्याच वर्षांनंतर IPL मध्ये पुनरागमन केले तर तर काही देशांतर्गत खेळाडूंनादेखील फ्रॅन्चायझींनी विकत घेतले.
इंडियन प्रीमियर लीग २०२१ (IPL 2021)चे खेळाडूंचा लिलाव चेन्नई येथे संपन्न झाला. ख्रिस मॉरिस IPL च्या इतिहासातील सर्वात महाग खेळाडू ठरला. ख्रिस मॉरिस १६.२५ कोटींमध्ये विकला गेला. ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सने विकत घेतले आहे. त्याचवेळी ग्लेन मॅक्सवेलला १४.२५ कोटींमध्ये विकत घेतले आहे.
ग्लेन मॅक्सवेलला RCB ने विकत घेतले आहे. बरीच मोठी नावे खूप जास्त किंमतीला विकली गेली होती तर कित्येकांना खरेदीदारही मिळाले नाही. इतकेच नव्हे तर काही खेळाडूंनी बऱ्याच वर्षांनंतर IPL मध्ये पुनरागमन केले तर तर काही देशांतर्गत खेळाडूंनादेखील फ्रॅन्चायझींनी विकत घेतले. चला एक नझर टाकूया लिलावानंतर खेळाडूंची यादीवर:
IPL लिलाव 2021 चे महागडे खेळाडू
ख्रिस मॉरिस (आफ्रिका) – राजस्थान रॉयल्सने १६.२५ कोटीमध्ये खरेदी केली
काईल जेम्सन (न्यूझीलंड) – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १५ कोटींमध्ये खरेदी केली
ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १४.२५ कोटी रुपयांना खरेदी केली
झाए रिचर्डसन (ऑस्ट्रेलिया) – पंजाब किंग्जने १४ कोटींमध्ये खरेदी केली
कृष्णपा गौतम (भारत)-चेन्नई सुपर किंग्जने ९.२५ कोटी रुपयांना खरेदी केली
रिले मेरेडिथ (ऑस्ट्रेलिया) – पंजाब किंग्जने ८ कोटींमध्ये खरेदी केली
मोईन अली (इंग्लंड) – चेन्नई सुपर किंग्जने ७ कोटींमध्ये खरेदी केली
शाहरुख खान (भारत) – पंजाब किंग्जने ५.२५ कोटीमध्ये खरेदी केली
टॉम कुर्रेन (इंग्लंड) – दिल्ली राजधानीने ५.२५ कोटी रुपयांना खरेदी केली
नॅथन कोल्टर नाईल (ऑस्ट्रेलिया) – मुंबई इंडियन्सने ५ कोटींमध्ये खरेदी केली
शिवम दुबे (भारत) – राजस्थान रॉयल्सने ४.४० कोटीमध्ये खरेदी केली
माइजेस हेनरिक्स (ऑस्ट्रेलिया) – पंजाब किंग्जने ४.२० कोटीमध्ये खरेदी केली
IPL च्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू
ख्रिस मॉरिस (आफ्रिका) – २०२१- राजस्थान रॉयल्सने १६.२५ कोटीमध्ये खरेदी केली
युवराज सिंग (भारत) – २०१५ – दिल्ली डेअरडेव्हिल्सने १६ कोटींमध्ये खरेदी केली
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) – २०२० – कोलकाता नाईट रायडर्सने १५.५० कोटीमध्ये खरेदी केली
काईल जेम्सन (न्यूझीलंड) -२०२१ – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १५ कोटींमध्ये खरेदी केली
बेन स्टोक्स (इंग्लंड) -२०१७-राइझिंग पुणे सुपरगिजंट्सने १४.५ कोटींमध्ये खरेदी केली
ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) – २०२१ – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १४.२५ कोटी रुपयांना खरेदी केली
युवराज सिंग (भारत) – २०१४ – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १४ कोटींमध्ये खरेदी केली
झाई रिचर्डसन (ऑस्ट्रेलिया) – २०२१ – पंजाब किंग्जने १४ कोटींमध्ये खरेदी केली
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला