असे आहेत आयपीएल 2021 साठीचे संघ

आयपीएल 2021(IPL 2021) साठी आठही फ्रँचाईजींचे संघ आता अंतिमतः तयार झाले आहेत.चेन्नई येथील गुरुवारच्या लिलावात प्रिती (Preity Zinta) झिंटाच्या किंग्ज पंजाब संघाने (Kings Punjab) सर्वाधीक नऊ नवे खेळाडू घेतले तर सनरायजर्स हैदराबादकडे (Sunrisers Hyderabad) सर्वात कमी तीन नवे खेळाडू आले. यंदाच्या लिलावानंतरही सर्वाधिक रक्कम शिल्लक राहिली ती किंग्ज पंजाबचीच. त्यांनी सर्वाधिक 9 खेळाडू आणले असले तरी त्यांची शिल्लक 18 कोटी 80 लाख रुपये आहे. सर्वात कमी रक्कम आता रॉयल चॕलेंजर्स बंगलोरकडे आहे. त्याच्याकडे आता फक्त 35 लाख शिल्लक आहेत. पंजाबनेच सर्वाधिक पाच परदेशी खेळाडू आपल्यासाठी खरिदले आहेत. आता सर्वच्या सर्व आठ फ्रँचाईजीच्या संघात परदेशी खेळाडूंचा कोटा (८) पूर्ण झाला आहे.

1) चेन्नई सुपर किंग्ज – 25 खेळाडू
विदेशी खेळाडू- 8
देशी खेळाडू – 7
नवे खेळाडू – 6
शिल्लक रक्कम- दोन कोटी 55 लाख

एम.एस. धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, फाफ डू प्लेसीस, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, सॕम करन, रॉबिन उथप्पा, एन. जगदीशन, लुंगी एनजीडी, मिशेल सँटनर, दीपक चाहर, के.एम.आसिफ, शार्दुल ठाकूर, इम्रान ताहीर, जोश हेझलवूड, आर साईकिशोर, कर्ण शर्मा
नवे खेळाडू – मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा आणि हरी निशांत

2) राजस्थान रॉयल्स – 24 खेळाडू
विदेशी खेळाडू – 8
देशी खेळाडू – 15
नवे खेळाडू – 8
शिल्लक रक्कम- 13 कोटी 65 लाख

संजू सॅमसन (कर्णधार), बेन स्टोक्स, यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, डेव्हिड मिलर, राहुल तेवटिया, मनन व्होरा, रियान पराग, श्रेयस गोपाल, जोफ्रा आर्चर, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी, अँड्र्यु टाय, मयंक मार्कंडे, महिपाल लोमरोर, अनुज रावत नवे खेळाडू- ख्रिस मॉरिस, शिवम दुबे, मुस्तफिजूर रहेमान, चेतन साकरिया, के.सी.करिअप्पा, लियाम लिव्हिंगस्टोन, कुलदीप यादव, आकाश सिंग

3) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर- 22 खेळाडू
विदेशी खेळाडू- 8
देशी खेळाडू – 14
नवे खेळाडू- 8
शिल्लक रक्कम – 35 लाख

विराट कोहली (कर्णधार), एबिडी विलीयर्स, देवदत्त पडीक्कल, जोश फिलीप, वॊशिंग्टन सुंदर, डॉनियल सॅम्स, युझवेंद्र चहल, अॕडम झम्पा, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, हर्षल पटेल, पवन देशपांडे, शहबाज अहमद नवे खेळाडू- ग्लेन मॕक्सवेल, रजत पाटीदार, सचिन बेबी, मोहम्मद अझहरुद्दीन, कायल जेमीसन, डॉनियल ख्रिस्तीयन, सुयश प्रभुदेसाई, श्रीकर भारत

4) मुंबई इंडियन्स- 25 खेळाडू
विदेशी खेळाडू- 8
देशी खेळाडू- 17
नवे खेळाडू- 7
शिल्लक रक्कम- 3 कोटी 65 लाख

रोहित शर्मा (कर्णधार), क्विटन डीकाॕक, सुर्यकूमार यादव, इशान किशन, ख्रिस लीन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, किरोन पोलार्ड, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमरा, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, जयंत यादव, आदित्य तारे, अनुकूल यादव, अनमोल प्रीतसिंग, धवल कुलकर्णी, मोहसीन खान नवे खेळाडू- अॕडम मिल्ने, नेथन कोल्टरनाईल, पियुष चावला, जेम्स निशॕम, युध्दवीर सिंग, मार्को जान्सेन आणि अर्जुन तेंडूलकर

5) कोलकाता नाईट रायडर्स- 25 खेळाडू
विदेशी खेळाडू- 8
देशी खेळाडू- 17
नवे खेळाडू- 8
शिल्लक रक्कम- 3 कोटी 20 लाख

इयान मॉर्गन (कर्णधार), शुभमन गील, नितीश राणा, दिनेश कार्तिक, सुनील नरीन, आंद्रे रसेल, टीम सेफर्ट, राहुल त्रिपाठी, लोकी फर्ग्युसन, पॕट कमिन्स, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, रिंकू सिंग, संदीप वॊरियर, प्रसिध्द कृष्ण

नवे खेळाडू – शकिब अल हसन, शेल्डन जॉकसन, वैभव अरोरा, करुण नायर, हरभजन सिंग, बेन कटींग, वेंकटेश अय्यर, पवन नेगी

6) सनरायजर्स हैदराबाद – 25 खेळाडू
विदेशी खेळाडू- 8
देशी खेळाडू – 17
नवे खेळाडू – 3
शिल्लक रक्कम- 6 कोटी 95 लाख

डेव्हिड वॊर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विल्यम्सन, मनीष पांडे, प्रियम गर्ग, विजय शंकर, जेसन होल्डर, अब्दुल समद, मिशेल मार्श, रशिद खान, अभिषेक शर्मा, मोहम्मद नबी, वृध्दिमान साहा, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, संदीप शर्मा, सिध्दार्थ कौल, शहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, खलील अहमद, बासील थाम्पी, विराट सिंग
नवे खेळाडू- जगदीश सुचीत, केदार जाधव, मुजीब उर रहमान

7) दिल्ली कॕपिटल्स- 25 खेळाडू
विदेशी खेळाडू – 8
देशी खेळाडू – 17
नवे खेळाडू – 8
शिल्लक रक्कम- 2.15 कोटी

श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शिखर धवन, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शेरॉन हेटमेयर, मार्कस् स्टोईनीस, रवीचंद्रन अश्विन, अमीत मिश्रा, अक्षर पटेल, कासिगो रबाडा, ख्रीस वोक्स, आॕन्रिच नोर्जे,इशांत शर्मा, आवेश खान, प्रवीण दुबे, ललित यादव.
नवे खेळाडू- स्टिव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपल पटेल, विष्णू विनोद, लुकमान मेरीवाला, मनीमारन सिध्दार्थ, टॉम करन आणि सॕम बिलिंग्ज

8) पंजाब किंग्ज- 25 खेळाडू
विदेशी खेळाडू- 8
देशी खेळाडू – 17
नवे खेळाडू- 9
शिल्लक रक्कम- 18 कोटी 80 लाख

के.एल.राहुल (कर्णधार), मयंक अगरवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, मनदीपसिंग, सरफराझ खान, दीपक हुडा, प्रभसिमरनसिंग, ख्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, इशान पोरेल, रवी बिश्नोई, एम.अश्विन, दर्शन नलकंडे
नवे खेळाडू- डेव्हिड मालन, झे रिचर्डसन, शाहरुख खान, रिली मेरेडीथ, मोझेस हेन्रिक्स, जलज सक्सेना, उत्कर्ष सिंग, फेबियन अॕलन आणि सौरभकुमार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER