IPL 2021 : प्रीती झिंटाची टीम किंग्ज इलेव्हन पंजाबने बदलली ओळख; आता ‘पंजाब किंग’ नावाने उतरेल

Kings Punjab

IPL 2021 च्या लिलावापूर्वी प्रीती झिंटाची टीम किंग्ज इलेव्हन पंजाबने (किंग्ज इलेव्हन पंजाब) संघाचे नाव बदलले. या हंगामापासून पंजाब संघाचे नाव पंजाब किंग असे ठेवले जाईल.

IPL 2021 सुरू होण्याची फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत. लिलावाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तशी तयारी जोर धरत आहे. या दरम्यान, किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाचे नाव बदलण्यात आल्याचे वृत्त आहे.

बदलले किंग्ज इलेव्हन पंजाबचे नाव

किंग्ज इलेव्हन पंजाबने आपले नाव बदलले आहे आणि इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या सत्रात त्याला ‘पंजाब किंग्ज’ संघ म्हटले जाईल. किंग्ज इलेव्हन पंजाब IPL च्या आठ संघांपैकी एक आहे; ज्यांनी अद्याप IPL अजिंक्यपद जिंकलेले नाही.

BCCI च्या एका सूत्राने सांगितले की, ‘हा संघ बर्‍याच काळापासून नाव बदलण्याचा विचार करीत होता आणि असे वाटते की आयपीएलपूर्वी हे करणे योग्य होईल. हा अचानक निर्णय नाही.’ मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीती झिंटा आणि करण पॉल यांच्या संघाला एकदादेखील आयपीएल जिंकता आले नाही. संघ एकदा उपविजेता होता आणि एकदा तिसऱ्या क्रमांकावर होता. पुढील आयपीएल (IPL 2021) एप्रिलमध्ये सुरू होईल आणि त्यासाठी लिलाव गुरुवारी होणार आहे.

स्पर्धेपूर्वी पंजाबचा मोठा निर्णय

या वर्षी पंजाबने आयपीएलमधील खेळाडूंना कायम ठेवण्यात मोठा निर्णय घेतला. त्याने ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला संघातून बाहेर जाण्याचा मार्ग दाखविला. मॅक्सवेलला पंजाबने १०.७५ कोटींच्या प्रचंड किमतीत खरेदी केले होते. इतकी मोठी रक्कम असलेला हा खेळाडू गेल्या वर्षी छाप सोडण्यात अपयशी ठरला होता.

रिलीज खेळाळू : ग्‍लेन मॅक्सवेल, शेल्‍डन कॉटरेल, करुण नायर, हार्डस विलॉइन, जगदीश सुचित, मुजीब उर रहमान, जिमी नीशाम, कृष्‍णा गौतम, तजिन्‍दर सिंह.

रिटेन खेळाळू : केएल राहुल, क्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोल्‍स पूरन, मनदीप सिंह, सरफराज खान, दीपक हुड्डा, प्रभसिमरन सिंह, मोहम्‍मद शमी, क्रिस जॉर्डन, दर्शन नलकांदे, रवि बिश्‍नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंह, हरप्रीत बरार, ईशान पोरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER