IPL 2021 Player Retention: संजू सॅमसनच्या कारकीर्दीचा टर्निंग पॉइंट, स्टीव्ह स्मिथला मागे टाकत बनला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार

Sanju Samson - IPL 2021

राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) संजू सॅमसनला (Sanju Samson) संघाचा नवा कर्णधार बनवले. स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) सोडण्यात आले आहे.

IPL च्या १४ व्या मोसमाच्या लिलाव फेब्रुवारीमध्ये होणार आहे. त्यापूर्वी फ्रॅंचायझीने पुढच्या हंगामासाठी आपल्या खेळाडूंना कायम राखले किंवा सोडले आहे. बर्‍याच खेळाडूंना मोठा धक्का बसला आहे, तर अनेक खेळाडूंचे नशीब चमकले आहे.

संजू सॅमसन बनला राजस्थानचा कर्णधार
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला सोडण्यात आले आहे. यावेळी संघाचा कर्णधारपद भारतीय विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनच्या ताब्यात देण्यात आले आहे. मागील मोसमात स्मिथच्या कर्णधारपदाचा आणि फलंदाजीचा फारसा परिणाम झाला नाही. IPL च्या 13 व्या मोसमात राजस्थान रॉयल्सचा संघ गुणांच्या पातळीवर शेवटचा होता. स्मिथने १३१ च्या स्ट्राईक रेटसह १४ सामन्यांत ३११ धावा केल्या, त्यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश होता.

तसेच गेल्या हंगामात संजू सॅमसनने शानदार प्रदर्शन केले आहे. त्याने खेळलेल्या १४ सामन्यांत २६ षटकारांसह ३७५ धावा केल्या. IPL मध्ये त्याने आतापर्यंत १०७ सामन्यात १९१ षटकार ठोकले आहेत.

राखलेले खेळाडू : संजू सैमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, रियान पराग, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, कार्तिक त्यागी, एंड्रयू टाई, जयदेव उनादकट, मयंक मारकंडे, यशस्वी जायसवाल, अनुज रावत, डेविड मिलर, मनन वोहरा, रोबिन उथप्पा.

सोडलेले खेळाडू : स्टीव स्मिथ, अंकित राजपूत, ओशेन थॉमस, आकाश सिंह, वरुण एरॉन, टॉम कुरेन, अनिरुद्ध जोशी, शशांक सिंह.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER