जाणून घ्या यंदाच्या आयपीएल वेळापत्रकाचे काय आहे वेगळेपण?

गेल्या वर्षी कोरोनाच्या (Corona) संकटापायी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल IPL) चे सामने भारतात न होता सुंयुक्त अरब अमिरातीत (UAE) झाले. अजून कोरोना (Corona) संपलेला नाही. आपल्याकडे अजुनही कोरोनाची साथ काळजी करण्याइतपत स्थितीत असतानाही यंदाचे आयपीएलचे सामने मात्र भारतात होणार आहेत. सामने रिकाम्या स्टेडियममध्ये होणार आहेत, प्रेक्षक असणार नाहीत एवढीच खबरदारी! आता यात प्रश्न हा आहे की यंदा जर भारतात सामने होऊ शकत आहे तर गेल्या वर्षी का होऊ शकत नव्हते?

या प्रश्नाचे उत्तर मिळणे अवघड आहे पण यावेळी आयपीएलच्या संचालन मंडळाने एक महत्त्वाचा बदल केला आहे तो असा की यावेळी आयपीएलचे सामने भारतात होणार असले तरी ते तटस्थ स्थळी होणार आहेत. म्हणजे आठ फ्रँचाईजींपैकी एकाचाही सामना त्यांच्या घरच्या मैदानावर होणार नाही. म्हणजे मुंबई इंडियन्स मुंबईत खेळणार नाही, दिल्ली कॕपिटल्स दिल्लीत खेळणार नाही, कोलकाता नाईट रायडर्सचा सामना कोलकाता येथे नसेल, सनरायजर्स हैदराबादचा सामना हैदराबादमध्ये होणार नाही. असा प्रयोग आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे.

अधिकच स्पष्ट करुन सांगायचे तर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हा सामना 13 एप्रिलला मुंबईत नाही की कोलकात्यात नाही, तर चेन्नईला होणार आहे. तसेच सनरायजर्स हैदराबाद व राॕयल चॕलेंजर्स बंगलोरचा सामना कोलकाता येथे होणार आहे.

9 एप्रिल ते 30 मे दरम्यान अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे सामना होणार आहे. प्लै आॕफ आणि अंतिम सामना अहमदाबादला होणार आहे.

भारतात यंदाच आॕक्टोबर -नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी हे आयपीएलचे आयोजन म्हणजे रंगीत तालीम असल्याचे मानले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER